ट्रम्पसोबत हे काय घडलं? भारता ऐवजी इराणचे नाव घेत केले विचित्र दावे; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump Viral Video : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांनी दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. अनेक देशांसोबत त्यांनी वैर साधले आहे. अगदी भारतासारख्या मित्र देशाबाबतही त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी अनेक वेळा भारतावर निशाणा साधत मोठे दावे केले आहे. पण यावेळी मात्र ट्रम्प शब्दांमध्ये असे कन्फ्यूज झाले की, त्यांनी भारताऐवजी इराणचे नाव घेत विचित्र गोष्टी बोलल्या आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक त्यांना ट्रोल करत आहेत.
सर्वांना माहितच असेल की ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय स्वत:ला देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. पण ट्रम्प काही ऐकण्याचे नाव घेईनात. मात्र यावेळी ट्रम्प यांना भारत पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्रम्प यांनी नुकतेच भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचा दावा केला होता.
व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांना हा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याच्या दरम्यानच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प भारताला इराणशी गोंधळात टाकत आहे. ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धबंदीऐवजी, इराण पाकिस्तान युद्धबंदी असे व्हिडिओत म्हटले आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
BREAKING: In an insane moment, Trump calls Iran a nuclear power, and claims to have stopped a war between Pakistan and Iran. “I heard they are shooting at each other. Two nuclear powers,” confusing Iran with India. His cognitive ability is GONE.pic.twitter.com/IHChAZrny3 — Really American 🇺🇸 (@ReallyAmerican1) October 15, 2025
व्हाइट हाइसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. यावेळी त्यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि इराण अणुशक्ती देश आहेत. मला कळाले की, ते एकमेकांवर हल्ला करत आहेत. त्यानंतर मी दोघांना सांगितले की, त्यांनी युद्ध संपवले नाही तर त्यांच्यावर २००% कर लादला जाईल आणि अमेरिका त्यांच्यासोबत कोणताही व्यापार करणार नाही. यामुळे हे युद्ध २४ तासांत थांबले. नाहीतर अणुयुद्धाचा धोका अटळ होता.
तसे तर ट्रम्प यांनी हा दावा भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत केला होता, पण व्हिडिओमध्ये भारताऐवजी इराण म्हटले असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडिओवर ट्रोलिंग करत खिल्ली उडवणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने सत्तरी मध्ये असे होतेच, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मला खात्री आहे, ते त्यांच्या वक्तव्यावर स्वत:च हासत असतील असे म्हटले आहे. आणखी काहींनी काल्पनिक युद्धे थांबवणे खूपच सोपे आहे, म्हणूनच कदाचित त्यांना नोबेल मिळाला नसेल असे म्हटले आहे. याशिवाय वेगवेगळे मिम्सही शेअर केले आहेत.