वॉशिंग्टन: एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयांनी जगाला हादरवून टाकले आहे तर दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी युरोपियन देशांवर तीव्र टीका केली आहे. जेडी वेंस यांनी म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फरन्समध्ये केलेल्या व्यक्तव्याने युरोपियन देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वेंस यांनी युरोपियन देशांच्या इमिग्रेशन धोरणावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय हस्तक्षेपावर जोरदार टीका केली आहे. वेंस यांच्या या वक्तव्यावर जर्मनीचे राष्ट्रपती फ्रँक वॉल्टर स्टीनमीर यांनी नाराजी व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्प यांचे वेंसच्या वक्तव्याला पाठिंबा
वेंस यांनी युरोपला स्वतःच्या सुरक्षेबाबत अधिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आणि अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर आता गोष्टी नव्या पद्धतीने होतील, असे स्पष्ट सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी वेंस यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे आणि युरोपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इमिग्रेशन धोरणांवरही वेंसच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
जर्मनीती कार दुर्घटनेच्या संदर्भ देत वेंस यांची टीका
वेंस यांनी केलेले व्यक्तव्य म्यूनिखमधील एका दुर्घटनेमुळे केले आहे. दोन दिवसांपूर्वीच एका युरोपिय व्यक्तीने लोकांच्या गर्दीवर गाडी चढवल्याने 36 लोक जखमी झाले होते. या घटनेचा संदर्भ देते वेंस यांनी म्हटले की, “आम्हाला किती वेळा अशा प्रकारचे हल्ले सहन करावे लागतील? शरणार्थींनी केलेल्या हल्ल्यांमुळे युरोप आणि अमेरिकेत बऱ्याच घटना घडल्या आहेत.” तसेच, कोणताही मतदार शरणार्थींसाठी आपले दरवाजे उघडण्यासाठी मतदान करत नाही, असेही ते म्हणाले.
जर्मनीत अमेरिकेचा राजकीय हस्तक्षेप
तसेच वेंस यांनी ग्रेटा थनबर्ग यांच्यावर भाष्य करत म्हटले की, “जर अमेरिकेने पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गच्या टीकेला 10 वर्षे सहन केले असेल, तर जर्मनीही काही महिने एलॉन मस्कला सहन करू शकतो.” वेंस यांनी जर्मनीच्या ऑल्टरनेटिव फॉर जर्मनी पक्षाच्या नेत्या एलिस वीडेल यांचीही भेट घेतली, यामुळे जर्मनीकडून राजकीय हस्तक्षेपाचे आरोप करण्यात आले.
जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांची वेंस यांच्यावर तीव्र टीका
या वक्तव्यांमुळे जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांनी वेंस यांच्यावर तीव्र टीका केली. राष्ट्रपती स्टीनमीर म्हणाले, “ट्रम्प यांच्या सत्तेच्या काळात अमेरिका आणि जर्मनीतील संबंध बिघडले आहेत. आपली आणि अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाची विचारसरणी भिन्न आहे.” तर दुसरीकडे स्टीनमीर यांनी यूरोपियन नेत्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि वेंस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान केल्याचा आरोप केला. जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांनी वेंस यांनी यूरोपला हुकूमशाही स्वरूपात दाखवल्याचा आरोप केला आणि त्यांचे विधान अस्वीकार्य असल्याचे म्हटले.