(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
द वॉल स्ट्रिट जनरलने दिलेल्या रिपोर्टनुसार, ट्रम्प इराणवर आणखी हल्ले करणार नसून यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, जोपर्यंत अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होत नाही, तपोर्यंत इराणवर मोठे हल्ला करणार नाहीत असे त्यांनी एका जवळच्या सहकार्याला सांगितले आहे. छोट्या-मोठ्या कारवाया सहन करण्याची मात्र, त्यांनी तयारी दर्शवली आहे.
ट्रम्प गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने इराणशी शांतता करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करत आहेत. या कारारामुळे होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली होईल असेही त्यांनी म्हटले आहे. परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीत. दोन्ही देशांत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरुन तणाव कायम आहे.
ट्रम्प यांनी इराण(Iran) ला त्यांचा युरेनियम संवर्धनाचा साठा दुसऱ्या देशाकडे सोपवण्याची आणि अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणने यासाठी सुरुवातील नकार दिला होत. पंरतु आता ते अमेरिकेच्या अटींवर करार करण्यास तयार आहेत. मात्र, अद्याप इराणकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
शिवाय अमेरिका युद्धाच्या सुरुवातीपासून ४ ते ५ आठवड्यात युद्ध संपेल, होर्मुझचा मार्ग खुला होईल असे दावे करत आहे. मात्र, हे दावे फोल ठरले असून इराणने होर्मुझवर पकड घट्ट केली आहे. यामुळे जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशांतर्गत राजकारणातही ट्रम्प अडचणीत आले आहे.
ट्रम्प यांच्यासाठी सर्वात धक्कादायक म्हणजे, त्यांच्या पक्षातील चार खासदारांनी इराण युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच अमेरिकन संसदेत खासदारांनी इराणविरुद्ध कारवाया रोखण्याच्या प्रस्तावावर मतदान केले आहे. यामुळे ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला त्यांच्या सरकारमधून विरोध होत आहे.
दुसरीकडे शांतता चर्चा सुरु असताना इराणचे आखाती देशांमध्ये हल्ले सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वीच इराणने कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता. पण यावर अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Ans: द वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, जोपर्यंत अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होत नाही, तपोर्यंत इराणवर मोठे हल्ला करणार नाहीत असे म्हटले आहे.
Ans: इराणसोबत शांतता करारावर अंतिम स्वाक्षरी होताच होर्मुझ मार्ग खुला होईल असे ट्रम्प यांनी केला आहे.






