US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संदसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; त्यांच्याच पक्षातील खासदारांनी फिरवली पाठ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच
या प्रस्तावाला अमेरिकन संसदेत २१५ पैकी २०८ मते मिळाली आहेत. ज्यामध्ये चार रिपब्लिकन खासदारांचाही समावेश आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संसदेची परवानगी घेतली नव्हती. या युद्धाला आता आता तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही दोन्ही देशांत अनेक चर्चांनंतरही कोणताही ठोस निकाल लागलेला नाही.
या प्रस्तावाच्या बाजूने रिपब्लिकन पक्षातील मिशिगनचे टॉम बॅरेट, ओहायोचे वॉरेन डेव्हिडसन, पेनसिल्व्हेनियाचे ब्रायन फिट्झपॅट्रिक आणि केंटकींचे थॉमस मॅसी यांचा समावेश आहे. या खासदारांनी डेमोक्रॅट्स पक्षासोबत मिळून युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे. सध्या हा प्रस्ताव हे विधेयक अमंलात येण्यासाठी सिनेट सभागृहात पाठवण्यात आले आहेत. मात्र, या प्रस्तावार ट्रम्प यांनी व्हेटो पॉवरचा वारल केल्यास विधेयक कायद्यात मंजूर होणे अशक्य आहे.
२८ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या युद्धाला शनिवारी १०० दिवस पूर्ण होती. या युद्धावर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार, अंदाजे २९ अब्ज डॉलर्सचा खर्च झाला आहे. हे युद्ध असेच सुरु राहिले तर १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
याशिवाय या युद्धामुळे आतापर्यंत ३,४०० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये १३ अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. याच युद्धामुळे जागितक स्तरावरही मोठे नुकसान बंद होत आहे. तणावामुळे होर्मुझ(Hormuz) चा महत्त्वाचा व्यापारी मार्ग बंद झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि गॅस पुरवठा रखडला आहे. ज्यामुळे इंधन दर गगनाला भिडले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून दोन्ही देशांमध्ये पडद्याआड शांतता चर्चा सुरु असल्याचा दावा केला जात आहे. परंतु अद्याप यातून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे अमेरिकन संसदेतील विरोधी प्रस्ताव युद्ध थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Ans: अमेरिकन संसदेत ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्यांना रोखण्यासाठी विरोधी प्रस्ताव मंजूर झाला आहे.
Ans: इराण युद्ध रोखण्यासाठीच्या प्रस्तावाला २१५ विरुद्ध २८ मते मिळाली आहे. ज्यामध्ये चार रिपब्लिकन खासदारांचाही समावेश आहे.






