'आम्हाला पाकिस्तानवर विश्वास नाही' ; US-Iran Deal वर इस्रायल असमाधानी, पाकच्या भूमिकेवर टीका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अझर यांनी इस्रायलचा पाकिस्तानवर विश्वास नसल्याचे म्हटले. त्यांच्या मते, पाकिस्तानची आतापर्यंतची भूमिका नींदनीय राहिली आहे. पाकिस्तानने पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ अनेक वेळा इस्रायलला विरोध केला आहे. पाकिस्तानच्या इस्रायलविरोधी वक्तव्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे यात काही नवीन नाही असेही ते म्हणाले. दरम्यान इस्रायल-पाकिस्तानमध्ये संबंध नसतानाही पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावू शकतो यावर त्यांनी टीका केली.
त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचे आमच्यासोबत गेल्या अनेक दशकांपासून तणावाचे संबंध राहिले आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी इस्रायलला कॅन्सर संबोधत मानतेसाठी धोकादायक ठरवले होते. त्यांनी इस्रायलसाठी अपश्बदांचा वापर केला होता. यावर अझर यांनी नाराजी व्यक्त करत पाकिस्तानच्या तटस्थ भूमिका आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील अमेरिका-इराण शांतता कराराला विरोध केला आहे. इस्रायल या कराराचा भाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इराणला कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे बाळगू दिली जाणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. नेतन्याहूंनी युद्ध अजूनही सुरु असल्याचा इशारा दिला.
तसेच ट्रम्प यांच्याशी संबंधावर भाष्य करताना म्हटले की, आम्ही दोघे अनेक मुद्द्यावर एकमत होतो, पण याचा अर्थ सर्वच मुद्द्यांवर समहती असेल असे नाही. इराणवर इस्रायलची भूमिका वेगळी असू शकते असे त्यांनी म्हटले.
DRDO successfully conducted the flight-test of the indigenously developed Long Range Land Attack Cruise Missile (LRLACM) from Dr APJ Abdul Kalam Island, Odisha. The missile achieved all mission objectives, validating critical technologies and demonstrating India’s growing… pic.twitter.com/uhZm4Y3BRo — Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) June 15, 2026






