फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिटन: अमेरिकेचे नवनिर्वातिच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच कोणत्या ना कोणत्या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र, या वेळी ते त्यांच्या नवीन लूकमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या बदललेल्या हेअरस्टाइलसह दिसत आहेत. हा लूक त्यांच्या समर्थकांसोबतच टीकाकारांनाही आकर्षित करत आहे.
हा व्हिडिओ फ्लोरिडामधील ‘ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लब’च्या खासगी मालमत्तेचा आहे. या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या समर्थकांना भेटत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांचे जोरदार स्वागत होताना दिसत आहे, आणि ट्रम्पही उत्साहाने याला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट पसरली आहे. त्यांनी नवीन लूक मध्ये पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट घातली आहे. तर त्यांनी हेअरस्टाईल देखील बदलेली आहे.
2 जानेवारी 2025 ला पदभार स्वीकारणार
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मायकेल सोलाकिविज यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, “अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज पाम बीचमधील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लबमध्ये.” डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
Your next President, President-Elect Donald J Trump, today at the beautiful Trump International Golf Club Palm Beach!! TRUMP-VANCE 2024! #MAGA #donaldtrump #trump2024 #palmbeach #florida @realdonaldtrump @teamtrump @trumpwarroom @trumpgolfpalmbeach @trumpgolf @whitehouse45 📸:… pic.twitter.com/B4asbHZoJ0
— Michael Solakiewicz (@michaelsolakie) December 18, 2024
यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड विजय मिळवला आहे. त्यांनी डेमोक्रिटक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभूत करुन राष्ट्राध्यक्ष स्थान मिळवले आहे. ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडुण आले आहेत. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. यामुळे त्यांच्या दुसरा कार्यकाळ कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्यांदा ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार
राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या यशांमुळे चर्चेत आहेत. टाइम मॅगझिनने ने त्यांना दुसऱ्यांदा ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवले आहे. या पुरस्काराने त्यांच्या ऐतिहासिक राजकीय प्रभावाला मान्यता दिली आहे. याआधी त्यांना हा पुरस्कार 2016 मध्ये मिळाला होता, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी विजय मिळवला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा लूक आणि त्यांच्या यशाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह असून, त्यांच्या नेतृत्वाबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत.