Petrol-Diesel Prices: रशियन तेलावरील सवलत संपली; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ, भारतात पेट्रोल-डिझेल आणखी महागणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Russian crude oil discount ends 2026 : जागतिक तेल बाजारातून सध्या एक अत्यंत चिंताजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन (Russia) सवलत अधिकृतपणे संपुष्टात आली आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) नाकेबंदीच्या काळात भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या ‘कठोर’ भूमिकेमुळे भारतासह संपूर्ण जगाला महागाईचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धानंतर अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियन तेलावर कडक निर्बंध लादले होते. तथापि, मार्च २०२६ मध्ये इराण युद्धाचा उद्रेक झाल्यानंतर आणि होर्मुझ नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट प्रचंड गडद झाले होते. या भीषण तुटवड्याला तोंड देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने मार्च २०२६ मध्ये एक विशेष तात्पुरती सूट जाहीर केली होती, जी पुढे १६ मे पर्यंत वाढवण्यात आली होती. ही सूट केवळ आधीच टँकरमध्ये भरलेल्या तेलाच्या खेपांना लागू होती. मात्र, आता ही मुदत संपल्याने रशियाकडून तेल खरेदी करणे अत्यंत कठीण आणि महाग होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Guerrilla Warfare: ‘प्राण देऊ, पण झुकणार नाही!’ अमेरिकन CIA प्रमुखांच्या गुप्त भेटीनंतर ‘हा’ देश थेट युद्धभूमीसाठी सज्ज
रशिया हा जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या निर्यातदार देशांपैकी एक आहे. अमेरिकेने रशियन तेलाचे दरवाजे बंद केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे ब्रेंट क्रूडच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, जर कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळासाठी चढे राहिले, तर तेल कंपन्यांवर त्याचा प्रचंड ताण येईल आणि अखेर याचा भुर्दंड सर्वसामान्यांच्या खिशाला सोसावा लागेल.
❗️The United States has not extended the exemptions from sanctions on Russian oil — the relevant licenses issued by the Trump administration in March and April have expired. These exemptions allowed the purchase of portions of Russian crude oil that had already been loaded onto… pic.twitter.com/GWPjTltmjn — 🪖MilitaryNewsUA🇺🇦 (@front_ukrainian) May 17, 2026
credit – social media and Twitter
भारतासाठी रशियन कच्चे तेल ही गेल्या काही वर्षांत एक प्रकारे ‘जीवनवाहिनी’ ठरली होती. सवलतीच्या दरात मिळणाऱ्या या तेलामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यास सरकारला मोठी मदत झाली होती. मात्र, एकीकडे होर्मुझ सामुद्रधुनीतील लष्करी तणावामुळे आखाती देशांतून येणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि दुसरीकडे रशियाचा मार्गही कठीण झाला आहे. या दुहेरी संकटामुळे देशांतर्गत बाजारात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Politics: ब्रिटनमध्ये सर्वात मोठं राजकीय संकट! निवडणुकीत सत्तेचा पत्ता कट, ‘Epstein Files’च्या वादळात अडकले PM Keir Starmer
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होतो. भाजीपाला, दूध, धान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक महाग झाल्यामुळे बाजारातील सर्वच गोष्टींचे भाव कडाडतात. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या व्यवहारवादी मुत्सद्देगिरीमुळे भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेला आता नव्या पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे. भारत सरकार आता या समस्येवर मात करण्यासाठी इतर देशांशी चर्चा करत असून, देशातील इंधनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.






