White House Firing : व्हाईट हाऊसबाहेर गोळीबारातील हल्लेखोराचा फोटो समोर; कोण आहे यामागील सूत्रधार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२३ मे) संध्याकाळी ६ च्या सुमारास पेनसिल्व्हेनिया एव्हेन्यू आमि १० व्या स्ट्रीट येथे गोळीबाराची घटना घडली. एका २१ वर्षीय तरुणाने बॅगेतून पिस्तुल काढून अचानक सुरक्षा रक्षकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडालेला होता.
यावेळी घटनास्थळी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा दलांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरात हल्लेखोर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु तेथे पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात एक सुरक्षा रक्षक आणि निरापराध नागरिकही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख २१ वर्षी नसीरे बेस्ट म्हणून करण्यात आली आहे. तो मूळचा मॅरिलँडचा रहिवासी होता. प्राथमिक तपासानुसार, नसीरे गेल्या काही काळापासून गंभीर मानसिक आजाराने त्रस्त होता.
धक्कादायक बाब म्हणजे, जून २०२५ मध्ये सीक्रेट एंजट्सना त्याने धमकावले होते. यामुळे तो आधीपासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. जुलै २०२५ मध्ये एका प्रतिबंधित हाय-सिक्युरिटी झोनमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात त्याला पकडण्यात आले होते.
या घटनेवेळी ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. परंतु सुरक्षा दलांनी हल्लेखोराला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा लक्षात घेता तात्काळ संपूर्ण परिसरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सीक्रेट सर्व्हिसने स्पष्ट केले आहे की, हल्लेखोराला बाहेरच रोखण्यात आले होते. सध्या या घटनेचा तपास सुरु असून याचा हेतू नेमका काय होता आणि यामध्ये आणखी कोणाचा सामवेश आहे याचो एफबीआयकडून तपास सुरु आहे.
White House Firing : अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’बाहेर गोळीबार; ट्रम्प यांच्याबाबत मोठी अपडेट…






