World IP Day: तुमच्या आयडियाची 'चोरी' टाळा! आज जागतिक बौद्धिक संपदा दिन; जाणून घ्या पेटंट आणि कॉपीराईटचे महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
World Intellectual Property Day 2026 theme : आजचे जग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. अशा काळात एखादी नवीन कल्पना किंवा शोध लावणे जेवढे कठीण आहे, तेवढेच कठीण ती कल्पना सुरक्षित ठेवणे आहे. आज २६ एप्रिल, म्हणजेच ‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ (World Intellectual Property Day). जगभरातील संशोधक, लेखक, कलाकार आणि डिझाइनर्सच्या सर्जनशीलतेला कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (WIPO) २००० सालापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
यंदाच्या जागतिक बौद्धिक संपदा दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे याची संकल्पना – “IP and Sports: Ready, Set, Innovate”. क्रीडा क्षेत्रात वापरले जाणारे अत्याधुनिक साहित्य (उदा. हाय-टेक शूज, स्मार्ट रॅकेट्स), खेळाडूंचे ब्रँड्स आणि चॅनेलवर होणारे सामन्यांचे थेट प्रक्षेपण या सर्वांच्या मागे ‘बौद्धिक संपदा’ असते. खेळांच्या जगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पेटंट आणि ट्रेडमार्क कशी महत्त्वाची भूमिका बजावतात, हे या वर्षाच्या संकल्पनेद्वारे जगाला सांगितले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील
बौद्धिक संपदा दिन केवळ साजरा करण्यासाठी नसून, तो आपल्या हक्कांप्रती जागरूक होण्यासाठी आहे. पेटंट (Patent), कॉपीराइट (Copyright), ट्रेडमार्क (Trademark) आणि इंडस्ट्रियल डिझाइन यांसारख्या साधनांमुळे संशोधकांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळते. जर तुम्ही एखादे पुस्तक लिहिले असेल, नवीन मशीन बनवले असेल किंवा एखादा वेगळा लोगो तयार केला असेल, तर त्याचे ‘आयपी’ संरक्षण घेतल्यास कोणीही त्याची चोरी करू शकत नाही. यामुळे केवळ वैयक्तिक आर्थिक फायदा होत नाही, तर ‘मेक इन इंडिया’ सारख्या मोहिमेलाही बळ मिळते.
World Intellectual Property Day is in just 3 days ⏳ Join us in celebrating the creators, innovators and entrepreneurs who are shaping the world of sports.#WorldIPDay — World Intellectual Property Organization (WIPO) (@WIPO) April 23, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Bet: युद्धाच्या नावावर नफेखोरी! अमेरिकन जवानाने देशाची गुपिते ‘पॉलीमार्केट’वर लावली पणाला; मादुरो छाप्याचा ‘असा’ झाला सौदा
बौद्धिक संपदा हक्क हे कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मानले जातात. ज्या देशात संशोधनाचे संरक्षण कडक असते, तिथे परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येते. भारतासारख्या विकसनशील देशात स्टार्टअप्स आणि तरुण उद्योजकांसाठी आपली ‘बौद्धिक संपदा’ नोंदवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यामुळे निरोगी स्पर्धा निर्माण होते आणि नवनवीन शोधांना प्रोत्साहन मिळते.






