RR Vs SRH Live Streaming (फोटो- ट्विटर)
राजस्थान रॉयल्सचे एसआरएचला 229 रन्सचे टार्गेट
वैभव सूर्यवंशीचे शानदार शतक
ट्रेविस हेडचे वादळ 6 रन्समध्ये शमले
Tata IPL 2026 SRH Vs RR Live Updates: आज जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. आज डबल हेडर असल्याने आज दोन सामने पाहायला मिळाले. दोन्ही सामन्यात दोनशे पेक्षा जास्त धावसंख्या पाहायला मिळाली. दरम्यान राजस्थानने (IPL 2026) प्रथम फलंदाजी करताना 228 रन्स केल्या. एसआरएचला विजयासाठी 229 रन्सचे टार्गेट दिले होते. एसआरएचने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभूत केले आहे.
एसआरएचची फलंदाजी
राजस्थानने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करण्यासाठी एसआरएचचे दोन आक्रमक फलंदाज म्हणजेच ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा मैदानात खेळण्यासाठी उतरले. दरम्यान सलामीची जोडी फार वेळ टिकू शकली नाही. ट्रेविस हेड केवळ 6 रन्स करून आउट झाला. त्यानंतर एसआरएचचा माजी कर्णधार आणि डावखुरा फलंदाज इशान किशन आणि अभिषेक शर्माने एसआरएचचा डाव सांभाळला.
अभिषेक शर्मा 57 रन्स करून आउट झाला. तर ईशान किशनने आपले आयपीएलमधले 20 वे अर्धशतक पूर्ण केले. माजी कर्णधार ईशान किशन 31 चेंडूत 74 रन्स करून आउट झाला. त्यानंतर नितीश रेड्डी आणि हेनरी क्लासेन यांनी भागीदारी केली. नितीश कुमार रेड्डी 36 रन्स करून आउट झाला.
RR Vs SRH Live: वैभवचं ‘शतक’ अन फरेराचं ‘तुफान’; ‘एसआरएच’ला विजयासाठी 229 रन्सचे टार्गेट
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी
राजस्थानच्या गोलंदाजांचा आज योग्य पद्धतीने उपयोग कर्णधार रियान परागने केल्याचे पाहायला मिळाले. जोफरा आर्चरने ईशान किशन आणि ट्रेविस हेड अशा दोन महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. तर डोनोव्हन फरेराने आक्रमक खेळी करत असलेल्या अभिषेक शर्माला आउट केले. ब्रजेशने रेड्डीची विकेट घेतली.
राजस्थानची फलंदाजी
एसआरएचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर राजस्थानच्या डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात आले. फॉर्ममध्ये असलेला यशस्वी जयस्वाल आज चांगली खेळी करू शकला नाही. 10 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानचा डाव सांभाळला.
Match 36. 18.3: Nandre Burger to Salil Arora 6 runs, Sunrisers Hyderabad 229/5 https://t.co/PVdpjhxVEy #TATAIPL | #RRvSRH — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामातील दुसरे शतक लगावले आहे. वैभव सूर्यवंशी 103 रन्स करून आउट झाला. तर दोन सामन्यात निराशाजनक खेळी करणाऱ्या ध्रुव जुरेलने 51 रन्सची खेळी केली. तर कर्णधार रियान पराग 7 रन्स करून आउट झाला. डोनोव्हन फरेराने आक्रमक 33 रन्सची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजाने आपल्या शैलीत काही फटके मारून धावसंख्येत वाढ केली.
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचकडून प्रफुल हिंगे, पॅट कमीन्स आणि अन्य गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये एकच विकेट मिळवता आली. एशान मलिंगाने यशस्वी जयस्वालला 10 रन्सवर आउट केले. साकीब हुसेनने वैभव सूर्यवंशीला 103 रन्सवर आउट केले. तर नितीश रेड्डीने ध्रुव जुरेलला आउट केले. पॅट कमीन्सने रियान परागला आउट केले. एशान मलिंगाने डोनोव्हन फरेराला आउट केले.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे , शिवांग कुमार,प्रफुल्ल हिंगे, एशान मलिंगा, हर्षल पटेल , झीशान अन्सारी.






