(फोटो सौजन्य-AI एआय) 
ऑटोमोबाइल

होंडा इलेक्ट्रिक मोटरसायकल बिझनेसचा डंका! EV कन्सेप्ट आणि ब्रँड फिल्मसाठी पटकावला रेड डॉट पुरस्कार २०२६

होंडा कंपनीने आपल्या अत्यंत अत्याधुनिक इलेक्ट्रिक संकल्पना मॉडेलने आणि एका नाविन्यपूर्ण जाहिरातपटाद्वारे जागतिक पातळीवरील सर्वोच्च डिझाइन पुरस्कारावर नाव कोरले आहे. या बहुमानामुळे दुचाकी जगतात होंडाच्या भविष्यातील तंत्रज्ञानाची आणि अनोख्या संकल्पनेची प्रचंड चर्चा रंगली आहे.

Atharva Rajopadhye
  • होंडाच्या 'EV Outlier Concept' आणि ब्रँड फिल्मला जागतिक स्तरावर 'रेड डॉट डिझाइन अवॉर्ड २०२६' पुरस्कार मिळाला.

  • २०३० नंतरच्या दुचाकींची अनोखी झलक दाखवणाऱ्या या EV मॉडेलमध्ये दोन्ही चाकांमध्ये इन-व्हील मोटर्सचा वापर केला आहे.

  • होंडा R&D चे संचालक तोशिनोबू मिनामी यांनी हा विजय भविष्यातील गरजा ओळखून केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा गौरव असल्याचे म्हटले.

होंडा कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे अस म्हणायला हवं. होंडाच्या 'EV Outlier Concept' या इलेक्ट्रिक टू व्हीलर संकल्पनेने डिझाइन कन्सेप्ट प्रकारात, तर “What Is a Electric Motorcycles” या ब्रँड फिल्मने ब्रँड अँड कम्युनिकेशन डिझाइन प्रकारात जागतिक स्तरावर मानल्या जाणाऱ्या 'रेड डॉट डिझाइन अवॉर्ड २०२६' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

EV आऊटलायर कन्सेप्ट

ही संकल्पना केवळ सध्याच्या गाड्यांची सुधारित आवृत्ती नसून २०३० नंतरच्या दुचाकींचे भविष्य दर्शवणारी एक नवीन दिशा आहे असे मानले जात आहे. जपान मोबिलिटी शो २०२५ मध्ये पहिल्यांदा सादर केलेल्या या मॉडेलमध्ये 'प्रिसिजन ऑफ इंट्रिन्सिक डिझाइन' या थीमचा वापर केला आहे. यात पुढील आणि मागील अशा दोन्ही चाकांमध्ये 'इन-व्हील मोटर' बसवल्यामुळे गाडीची रायडिंग पोझिशन अत्यंत खाली ठेवणे शक्य झाले आहे. स्मोक-क्लियर बॉडी आणि गुळगुळीत पृष्ठभागामुळे रायडरला वेगवान आणि हवेत तरंगल्यासारखाच जणू अनुभव मिळतो.

ब्रँड फिल्म काय होती?

होंडाच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल व्यवसायाचे ब्रीदवाक्य "Expected life. Unexpected discoveries." असे आहे. या ब्रँड फिल्ममध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून मानवी जीवन अधिक सोपे, सुलभ आणि रोमांचक कसे बनवता येईल, याचे चित्रण केले आहे. तसेच भविष्यातील समाज आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे दाखवत नवीन जीवनशैलीचा मार्ग यात मांडण्यात आला आहे.

तोशिनोबू मिनामी (व्यवस्थापकीय संचालक, होंडा R&D) यांचे मनोगत

‘रेड डॉट हा जगातील सर्वात मानाचा डिझाइन पुरस्कार आहे आणि आमच्या डिझाइन संकल्पनेला तसेच ब्रँड फिल्मला हा बहुमान मिळणे अत्यंत अभिमानास्पद आहे. भविष्यातील गरजा ओळखून काळाच्या पुढे जाणाऱ्या तंत्रज्ञानाला आकार देण्याच्या आमच्या प्रयत्नांची ही पावती आहे. होंडा यापुढेही ग्राहकांना थक्क करणारे आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे उपक्रम राबवत राहील.’

Asia Cup rising Stars : सोन्याच्या लंकेतील दुष्काळ संपला, श्रीलंका नवी 'रायझिंग स्टार्स'; गतविजेत्या पाकड्यांची रडू'निती' चालली नाही

ह्युंदाईची भारतासाठी पहिली MPV येणार; टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला मिळणार नवी स्पर्धा

फोक्सवॅगनच्या इम्पोर्ट प्रोसेसवर केंद्र सरकारचा आक्षेप; 10,500 कोटींच्या करप्रकरणात मर्सिडीज, BMW चाही उल्लेख

World News : ट्रम्प यांच्या ‘जगातील सर्वात खास मेजवानी’त सेलिब्रिटींची मांदियाळी;अनेक दिग्गजांची उपस्थिती

Maharashtra Politics : शरद पवार एका दिवसात वाईट कसे झाले? चंद्रकांत पाटलांचा सवाल; संजय राऊतांवरही निशाणा