(फोटो सौजन्य-AI एआय) 
ऑटोमोबाइल

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

किया इंडियाच्या विस्तारित बायबॅक योजनेत पेट्रोल, डिझेल, CNG, हायब्रिड आणि EV मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. ICE कारसाठी 3, 4 किंवा 5 वर्षे, तर EV साठी 3 किंवा 4 वर्षांचे कालावधी ऑप्शन मिळतील. वार्षिक 10,000, 15,000 आणि 20,000 किमीचे मायलेज पर्यायही निवडता येतील.

Atharva Rajopadhye
  • किया इंडियाच्या योजनेत 3 वर्षांनंतर ICE कारसाठी 75% पर्यंत रिसेल व्हॅल्यूची हमी मिळू शकते.

  • इलेक्ट्रिक वाहनांसाठी 70% पर्यंत खात्रीशीर पुनर्विक्री मूल्य असून, लागू अटी व शर्तींचे पालन आवश्यक आहे.

  • सोनेट, सिरोस, न्यू सेल्टॉस, कॅरेन्स आणि इतर निवडक मॉडेल्ससाठी कालावधी व मायलेजचे विविध ऑप्शन देण्यात आले आहेत.

देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनी किया इंडियाने आपल्या आयसीई, हायब्रिड आणि ईव्ही पोर्टफोलिओमध्ये 'अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्रॅम'च्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली. हा उपक्रम ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या भविष्यातील मूल्याची खात्री देऊन गाडी बदलणे किंवा अपग्रेड करणे अधिक सुलभ व सोयीस्कर बनवतो.

या विस्तारित प्रोग्रामअंतर्गत, पात्र ग्राहकांना ३ वर्षांच्या कालावधीत आयसीई मॉडेल्ससाठी ७५ टक्क्यांपर्यंत आणि ईव्ही मॉडेल्ससाठी ७० टक्क्यांपर्यंत अ‍ॅश्युअर्ड रेसिड्यूअल व्हॅल्यूचा (रीसेल व्हॅल्यू) लाभ घेता येईल. वाहनाच्या खरेदीच्या वेळीच भविष्यातील खात्रीशीर मूल्य निश्चित होत असल्याने, ग्राहकांना अधिक पारदर्शकतेने आणि विश्वासाने त्यांच्या वाहनाच्या मालकीहक्काच्या प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.

या प्रोग्रामअंतर्गत किया इंडियाच्या सोनेट, सिरोस, न्यू सेल्टॉस, कॅरेन्स, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि सोरेंटो या प्रमुख मॉडेल्सचा समावेश करण्यात आला असून पेट्रोल, डिझेल, सीएनजी, हायब्रिड आणि ईव्ही अशा सर्व उपलब्ध पॉवरट्रेन पर्यायांवर ही योजना लागू असेल. ग्राहकांच्या विविध गरजा विचारात घेऊन आयसीई मॉडेल्ससाठी ३, ४ किंवा ५ वर्षे आणि ईव्ही मॉडेल्ससाठी ३ किंवा ४ वर्षांचे लवचिक कालावधी पर्याय देण्यात आले आहेत. यासोबतच वार्षिक १०,००० किमी, १५,००० किमी किंवा २०,००० किमीचे मायलेज पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून, एकूण मालकी कालावधीत १,००,००० किमीपर्यंतच्या प्रवासाचा यात समावेश होतो.

किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले* , " वाहन खरेदी हा एक दीर्घकालीन निर्णय असतो आणि ग्राहक भविष्यातील रीसेल व्हॅल्यू व अपग्रेडच्या सुलभतेबाबत निश्चितता शोधत असतात. ३ वर्षांत आयसीईवर ७५ टक्क्यांपर्यंत आणि ईव्हीसाठी ७० टक्क्यांपर्यंत उद्योगातील सर्वोत्तम पुनर्विक्री मूल्याची (रिसेल व्हॅल्यू) गॅरंटी देऊन आम्ही ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत करत आहोत. पहिल्या खरेदीपासून ते पुढील एक्सचेंज किंवा अपग्रेडपर्यंत सातत्यपूर्ण मूल्य देण्याची आमची कटिबद्धता यातून सिद्ध होते."

हा प्रोग्राम सर्व अधिकृत किया डीलर भागीदारांमार्फत उपलब्ध केला जाईल. पात्र ग्राहक नवीन वाहन खरेदी करताना लागू निकषांनुसार या योजनेत नोंदणी करू शकतात आणि निवडलेल्या कालावधीच्या शेवटी अटी व शर्तीनुसार खात्रीशीर बायबॅक मूल्याचा लाभ घेऊ शकतात.

Latur : 'आरबीआयच्या पत्राचा नीट अभ्यास करा!' धीरज देशमुखांचा निलंगेकरांना सल्ला

Relationship tips: नात्यात पर्सनल स्पेस असणे का महत्त्वाचे आहे? प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांना द्या थोडा वेळ

Delimitation Bill 2026: लोकसभेतील १६ पक्ष ठरणार गेमचेंजर! परिसीमन विधेयकासाठी NDA चे बहुमताचे गणित कसे जुळणार?

Emraan Hashmi Viral Video: जिनिलियाच्या कानातल्यांसोबत इम्रानने केलं असं काही... रितेश देशमुखचा चेहरा पाहण्यासारखा

Kabaddi Tournament : निवारा हिड इंडिया महिलांच्या उपउपांत्य फेरीत; पुरुषांत चार संघांची आगेकूच