किआ इंडियाने 'मेड-इन-इंडिया' सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण करत अनंतपूर कारखान्यात तिचे उत्पादन सुरू केले आहे.
ही एसयूव्ही ऑल-व्हील ड्राईव्हसह किआची पहिली हायब्रिड गाडी असून डिझेल इंजिन पर्यायातही उपलब्ध असेल.
जगातील लाइव्ह जनरेटिव्ह AI असिस्टंट असणारी आणि भारतातील पहिली जनरेटिव्ह AI वैशिष्ट्य असलेली ही सोरेंटो ठरणार आहे.
देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनी किआ इंडियाने आज भारतात लाँच होण्यापूर्वी आपल्या फ्लॅगशिप ३-रो एसयूव्ही 'किआ सोरेंटो'च्या पहिल्या अधिकृत चित्रांचे अनावरण केले आहे. यासोबतच कंपनीने आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील कारखान्यात सोरेंटोचे स्थानिक उत्पादन सुरू केले असून, आज पहिली 'मेड-इन-इंडिया' सोरेंटो प्रॉडक्शन लाईनमधून बाहेर पडली आहे.
किआ सोरेंटो ही भारतासाठी ऑल-व्हील ड्राइव्हसह येणारी किआची पहिली हायब्रिड एसयूव्ही आहे. ही व्हेईकल एकाच वेळी इलेक्ट्रिफिकेशन आणि प्रगत ड्रायव्हिंग क्षमतेचा उत्तम मेळ साधते. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य देत सोरेंटो हायब्रिडसोबतच शक्तिशाली डिझेल इंजिन पर्यायातही उपलब्ध असेल.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेताना, सोरेंटो ही जागतिक स्तरावर 'लाइव्ह जनरेटिव्ह एआय'वर आधारित किआ एआय असिस्टंट असणारी पहिलीच सोरेंटो ठरेल. हे तंत्रज्ञान किआच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये प्रथमच येत असून, भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगातही लाइव्ह जनरेटिव्ह एआयचे हे पहिलेच आगमन आहे. पारंपरिक व्हॉइस असिस्टंटपेक्षा वेगळे, हे एआय रिअल-टाइम आणि अपडेटेड माहितीसह संवादात्मक अनुभव प्रदान करते.
अनावरण केलेल्या चित्रांमध्ये सोरेंटोचा भव्य आकार, मस्क्युलर रोड प्रेझन्स आणि वैशिष्ट्यपूर्ण बाह्य रचना स्पष्टपणे दिसून येते. किआच्या जागतिक डिझाईन तत्त्वज्ञानावर आधारित या एसयूव्हीमध्ये अत्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर ३-रो सिटिंग लेआउटसह प्रीमियम इंटीरिअर्स देण्यात आले आहेत.
किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ ग्वांगू ली म्हणाले, "सोरेंटो ही प्रदीर्घ काळापासून किआच्या जागतिक एसयूव्ही नेतृत्वाचे प्रतीक राहिली आहे. अनंतपूर कारखान्यातून पहिली सोरेंटो बाहेर पडणे हा आमच्या भारतातील प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. देशातील आमची पहिली हायब्रिड एसयूव्ही असण्यासोबतच, लाइव्ह जनरेटिव्ह एआय सादर करणारी ही जगातील पहिली सोरेंटो आहे. ही पहिली चित्रे म्हणजे आगामी अनुभवाची फक्त एक झलक आहे; लाँचच्या वेळी भारतीय ग्राहकांना यात आणखी बरेच काही पाहायला मिळेल."