(फोटो सौजन्य-AI एआय) 
ऑटोमोबाइल

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!

महिंद्रसोबतची चर्चा अपयशी ठरल्यानंतर स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत धोरणात्मक इक्विटी भागीदारीबाबत चर्चा सुरू केली आहे.

Atharva Rajopadhye
  • स्कोडा ऑटो फोक्सवॅगनने नवीन एसयूव्ही पोर्टफोलिओसाठी आणि सीएमपी२१ प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत इक्विटी भागीदारीबाबत चर्चा सुरू केली आहे.

  • महिंद्रा अँड महिंद्रासोबतची प्राथमिक चर्चा धोरणात्मक मतभेदांमुळे मोडून पडल्यानंतर जेएसडब्ल्यू ग्रुप पसंतीचा भागीदार म्हणून समोर आला आहे.

  • या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १ अब्ज युरोपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित असून, मिड-२०२७ लाँचिंगचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने आपल्या नवीन पिढीच्या एसयूव्ही पोर्टफोलिओसाठी आणि निधी उभारणीसाठी जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत धोरणात्मक इक्विटी भागीदारीबाबत चर्चा सुरू केली आहे. ही नवीन भागीदारी सीएमपी२१ प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे.

फोक्सवॅगन ग्रुपच्या भारतीय subsidiery ने MQB A0 37 प्लॅटफॉर्म सोडत अधिक अष्टपैलू अशा सीएमपी२१ आर्किटेक्चरची निवड केली आहे. या नवीन प्लॅटफॉर्मवर अंतर्गत ज्वलन, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक एसयूव्ही वाहनांची मालिका तयार केली जाण्याची योजना आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १ अब्ज युरोपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित असून, प्रकल्पाचा खर्च उचलण्यासाठी आणि त्याला मंजुरी मिळवण्यासाठी स्थानिक इक्विटी भागीदाराची जोड देणे गरजेचे असल्याचे फोक्सवॅगन ग्रुपने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रासोबत प्राथमिक चर्चा झाली होती, परंतु धोरणात्मक प्राधान्यक्रम आणि मूल्यांकनावरून झालेल्या मतभेदांमुळे ती चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर जेएसडब्ल्यू-एमजी इंडिया मध्ये इक्विटी हिस्सेदारी असलेला जेएसडब्ल्यू ग्रुप हा या भागीदारीसाठी प्राधान्याचा भागीदार म्हणून समोर आला आहे.

म्युनिक मोबिलिटी शोमध्ये 'ऑटोकार प्रोफेशनल'शी बोलताना, स्कोडा ऑटोचे जागतिक सीईओ क्लॉस झेलमर यांनी भागीदाराच्या सुरू असलेल्या शोधाला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, "सांस्कृतिक जुळवाजुळव आणि व्यावसायिक उद्दिष्टे एकत्र करण्यासाठी धोरणात्मक पर्याय म्हणून भागीदारी महत्त्वाची ठरते. यासंदर्भातील संधी अद्यापही हातातून गेलेली नाही."

दरम्यान, या कराराला अद्याप अंतिम हिरवा झेंडा मिळालेला नाही, तरीही नियोजित मिड-२०२७ लाँचमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून सीएमपी२१ प्लॅटफॉर्मवरील तयारी सुरूच ठेवण्यात आली आहे. भारत हा सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ बनला असून, तेथे जोखीम कमी करण्यासाठी आणि वाढीला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑटोमेकर कंपन्या स्थानिक भागीदारांचा मार्ग स्वीकारत असल्याचे या चर्चेवरून स्पष्ट होते.

Asia Cup rising Stars : सोन्याच्या लंकेतील दुष्काळ संपला, श्रीलंका नवी 'रायझिंग स्टार्स'; गतविजेत्या पाकड्यांची रडू'निती' चालली नाही

ह्युंदाईची भारतासाठी पहिली MPV येणार; टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला मिळणार नवी स्पर्धा

फोक्सवॅगनच्या इम्पोर्ट प्रोसेसवर केंद्र सरकारचा आक्षेप; 10,500 कोटींच्या करप्रकरणात मर्सिडीज, BMW चाही उल्लेख

World News : ट्रम्प यांच्या ‘जगातील सर्वात खास मेजवानी’त सेलिब्रिटींची मांदियाळी;अनेक दिग्गजांची उपस्थिती

Maharashtra Politics : शरद पवार एका दिवसात वाईट कसे झाले? चंद्रकांत पाटलांचा सवाल; संजय राऊतांवरही निशाणा