Studds Z600 Helmet Launches With ECE 22.06 Certification  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

2,000 रुपयांच्या आत मिळणार युरोपियन सेफ्टी असलेले हेल्मेट! Studs Z600 हेल्मेट भारतात लाँच; ECE 22.06 सर्टिफिकेशनही मिळणार

स्टड्सने भारतात Z600 ओपन फेस हेल्मेट 1,695 रुपयांना लाँच केले आहे. 2,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ECE 22.06 सर्टिफिकेशन मिळवणारे हे पहिले हेल्मेट असल्याचा कंपनीचा दावा आहे. 3 रंग, स्क्रॅच प्रतिरोधक व्हायझर, EPS लाइनर आणि क्विक रिलीज स्ट्रॅप ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

Atharva Rajopadhye
  • स्टड्स Z600 हेल्मेट भारतात 1,695 रुपयांच्या किमतीत लाँच झाले.

  • 2,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ECE 22.06 सर्टिफिकेशन मिळवणारे पहिले हेल्मेट.

  • ग्लॉस ब्लॅक, मॅट ब्लॅक आणि ग्लॉस व्हाइट रंगांमध्ये विक्री सुरू.

दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट खरेदी करताना किंमत आणि सेफ्टी स्टँडर्ड या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हीच गरज लक्षात घेऊन STUDDS कंपनीने भारतीय मार्केटमध्ये नवीन Z600 हेल्मेट लाँच केले आहे. या हेल्मेटची किंमत फक्त 1,695 रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ECE 22.06 सर्टिफिकेशन मिळवणारे हे भारतातील पहिले हेल्मेट असल्याचा कंपनीचा दावा आहे. या सर्टिफिकेशनमुळे बजेटमध्ये आधुनिक सुरक्षा मानक असलेले हेल्मेट शोधणाऱ्या रायडर्सना नवीन ऑप्शन मिळाला आहे.

3 रंगांमध्ये सुरुवातीला विक्री

स्टड्स Z600 हेल्मेट ग्लॉस ब्लॅक, मॅट ब्लॅक आणि ग्लॉस व्हाइट अशा 3 रंगांमध्ये सादर करण्यात आले आहे. याशिवाय पेस्टल आणि मेटॅलिक शेड्समध्येही नवीन रंग आणण्याची कंपनीची योजना आहे. या हेल्मेटमधील एका व्हेरिएंटचा रंग निवडण्याची संधी थेट रायडर्सना देण्यात आली आहे. यासाठी कंपनीने इंस्टाग्रामवर पोल सुरू केले असून कस्टमर्स स्वतःच्या पसंतीचा रंग निवडू शकतात.

हे ओपन फेस हेल्मेट असून त्यामध्ये लांब व्हायझर देण्यात आले आहे. या व्हायझरवर सिलिकॉन कोटिंग करण्यात आले असून त्यामुळे स्क्रॅचपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. हेल्मेटच्या बाहेरील शेलसाठी हाय इम्पॅक्ट रेझिस्टंट मटेरियल आणि आतमध्ये हाय डेन्सिटी EPS लाइनरचा वापर केला आहे.

ECE 22.06 सर्टिफिकेशनमुळे सुरक्षिततेवर भर

स्टड्स Z600 चे वजन 1,050 ग्रॅम असून त्यात 50 ग्रॅमपर्यंत फरक असू शकतो. हेल्मेटमध्ये हायपोअलर्जेनिक लाइनर, काढता येणारे चीक पॅड्स, नेक कर्टन आणि पॅडेड चिन स्ट्रॅप देण्यात आला आहे. याशिवाय क्विक रिलीज चिन स्ट्रॅप आणि स्टेनलेस स्टीलचे गंजरोधक बकल मिळते.

यातील ECE 22.06 हे युरोपियन सुरक्षा सर्टिफिकेशन आहे. जुन्या ECE 22.05 मानकाच्या तुलनेत या नवीन मानकामध्ये हेल्मेटची जास्त कठोर चाचणी केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या वेगांवर रोटेशनल इम्पॅक्ट टेस्ट आणि व्हायझरच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाते. त्यामुळे हेल्मेटच्या संरक्षणात्मक गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी हे मानक महत्त्वाचे ठरते.

स्टड्स कंपनीची मोठी प्रोडक्शन कॅपसिटी

स्टड्स कंपनीला 2024 मध्ये विक्रीच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात मोठी टू-व्हीलर हेल्मेट उत्पादक कंपनी म्हणून CARE रिपोर्टमध्ये स्थान मिळाले होते. कंपनीच्या 3 प्रोडक्शन प्लांट्सची एकत्रित वार्षिक कॅपसिटी 9.04 मिलियन हेल्मेट्सची आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने सुमारे 7.10 मिलियन हेल्मेट्सची विक्री केली होती. स्टड्स आणि SMK या ब्रँडअंतर्गत कंपनी हेल्मेट्स आणि इतर रायडिंग अॅक्सेसरीजची विक्री करते. नवीन Z600 हेल्मेट कंपनीच्या रिटेल नेटवर्क, एक्सक्लुझिव्ह आउटलेट्स आणि इतर विक्री माध्यमांतून खरेदी करता येणार आहे.

Chandrapur News: कोळसा खाणींच्या धुळीचा शेतीला फटका; कापसाच्या उत्पादनावर धुळीचे साम्राज्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Nagpur News : रायझिंग नागपूरसाठी विकासाचा महाआराखडा; ४०० गुंतवणूकदार येणार; चेहरामोहरा बदलणार

वॅगनआर कारमधून आलेल्या चौघांनी अडवली सोन्याची व्हॅन! एमआयडीसीत १६ किलोहून अधिक सोन्याची लुट

India A tour of Nepal: रायझिंग स्टार्समधून बाहेर, आता Team India निघणार नेपाळ दौऱ्यावर! कधी अन् कुठे भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ducati DesertX V2 भारतात लाँच; किंमत 19.99 लाख रुपये, डिसेंबरपासून डिलिव्हरी सुरू