सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! ( सौजन्य - सोशल मीडिया )  
Business

Retail Inflation CPI : बाप रे... सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला; किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर

Retail Inflation CPI : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा आणि तीव्र झटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून ५.५४ टक्क्यांवर पोहोचला असून, या दरवाढीने मागील २३ महिन्यांचे विक्रम मोडून काढले आहेत.

Ankita Karangutkar
  • सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक!
  • थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला
  • किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर

Retail Inflation CPI : महागाईचा विळखा सामान्यांच्या गळ्याला आणखीनच तीव्र होत चालला आहे. हे स्पष्ट दर्शवणारे आकडे नुकतेच समोर आले आहेत. सोमवारी भारताचा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI त्यालाच किरकोळ महागाई म्हटलं जातं, त्याचे सप्टेंबर 2026 चे आकडे थेट 5.54 % वर पोहोचले आहेत. या आकड्यांसह महागाईने गेल्या 23 महिन्यांचं रेकॉर्ड मोडत सर्वोच्च पातळी गाठली आहे. ( Retail Inflation CPI ) 

अन्नधान्याच्या किंमतींनी एकूण महागाईवर दबाव

कंज्यूमर फूड प्राइस इंडेक्स CFPI याद्वारे मोजली गेलेली महागाई आकडे 7.74% इतकी होती. इतर परिस्थितीमुळे वाढलेल्या अन्नधान्याच्या किंमतींनी एकूण महागाईवरचा दबाव कायम ठेवला. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये महागाईचा दबाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ग्रामीण भागातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 6.08% पर्यंत वाढली, तर शहरी भागांमधील महागाई 4.88 % इतकी होती. पण ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये अन्नधान्य महागाईचा दर अनुक्रमे 8.06% आणि 7.18 % इतका होता.

नवीनतम आकडेवारी काय सांगतात?

ऑगस्टमध्ये २.६१% असलेली हाऊसिंग महागाई वाढून २.७४% झाली. तर कपडे आणि इतर वस्तूंची महागाई देखील मागील महिन्यातील ३.५६% च्या तुलनेत वाढून ती ३.९३% पर्यंत पोहोचली. ही नवीनतम आकडेवारी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे, ज्याचे आधारभूत वर्ष २०२४ आहे. ही आकडेवारी प्राथमिक असून ती ग्रामीण आणि शहरी दोन्ही बाजारांमधील किमतींमधील बदल दर्शवते.

ऑक्टोबर २०२६ चे CPI आकडे कधी?

MoSPI ने सांगितल्यानुसार, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १,४०७ शहरी बाजारपेठा यामध्ये ऑनलाइन बाजारपेठांचा देखील समावेश आहे. त्यासोबत १,४६५ गावांमधून किमतींची माहिती गोळा करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात ग्रामीण आणि शहरी दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रतिसाद दर १००% इतका होता. ऑक्टोबर २०२६ साठीची ग्राहक किंमत निर्देशांक CPI महागाईची आकडेवारी १२ नोव्हेंबर रोजी, किंवा त्या दिवशी सुट्टी आली तर पुढच्या कामकाजाच्या दिवशी प्रसिद्ध करणार आहेत.

बिजवाई सोयाबीनला ८ हजारावर भाव! चार वर्षांनंतर सोयाबीनला सोन्याची झळाळी; शेतकऱ्यांना दिलासा

Iran : इराणची युद्धनीती जगात भारी! अमेरिकेला मात देण्यासाठी वापरले इलॉन मस्कचेच तंत्रज्ञान; स्टारलिंकचा वापर करून उडवले US Air Base

म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी; 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा

IND vs NZ: किवींनी भारताचा खेळ बिघडवला! तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दबदबा; दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया बॅकफूटवर