File Photo : Crime 
क्राईम

तीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; सासरच्यांचा थेट जावयावर संशय, पोलिसांतही तक्रार

26 सप्टेंबर रोजी रात्री पांडुरंग तायडे हे झोपले होते. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील चैन पत्नीला दिसली नाही. त्यानंतर साखळीबाबत विचारणा केली असता, पांडुरंग यांनी ती बाथरूममध्ये पाहिली. मात्र, बाथरूममध्येही साखळी दिसत नसल्याचे सांगितले.

कृपादान आवळे

अमरावती : आंघोळीच्यावेळी काढून ठेवलेली 30 ग्रॅम सोन्याची साखळी चोराने लंपास केली. ही घटना गेल्या मंगळवारी (दि.24) दुपारी राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रवी नगरमध्ये उघडकीस आली. पांडुरंग नानाजी तायडे (वय 59, रा. रवी नगर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी मनोज ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते पाडुरंग तायडे यांचे जावई आहेत.

पांडुरंग तायडे हे 24 सप्टेंबर रोजी दुपारी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. यावेळी त्यांनी गळ्यातील 2 लाख 60 हजार रुपये किमतीची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून ठेवली होती. काही वेळाने त्यांना भाचीचा फोन आला. तिने पांडुरंगकडे चार हजार रुपये मागितले. मात्र, आधी दिलेले पैसे परत केले नाहीत; तर पुन्हा पैसे कसे देणार असे पांडुरंगने सांगितले.

दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी रात्री पांडुरंग तायडे हे झोपले होते. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील चैन पत्नीला दिसली नाही. त्यानंतर साखळीबाबत विचारणा केली असता, पांडुरंग यांनी ती बाथरूममध्ये पाहिली. मात्र, बाथरूममध्येही साखळी दिसत नसल्याचे सांगितले.

पांडुरंग तायडे यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यानंतर त्यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पांडुरंगने त्यांचा जावई ठाकूर यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मनोज ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कानातले Earbuds आता तुमचे बोलणे लिहून देणार! AI चे भन्नाट फीचर

IND A vs SL A: फायनलसाठी आरपारची लढाई! श्रीलंकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारत सज्ज; सेमीफायनलचा थरार कधी अन् कुठे?

Family: कुटुंबापासून दूर राहताय? नात्यांमध्ये वाढतोय दुरावा? कुटुंबाशी जवळीक टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

Rahul Gandhi Instagram Story: राहुल गांधींनी शेअर केला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा 'तो' व्हायरल फोटो; सोशल मीडियावर खळबळ

गाडी आडवी मारल्याचा राग अनावर अन् थेट पाठलाग करून चिरला गळा! कोल्हापूर-सांगली सीमेवर व्यावसायिकाची निर्घृण हत्या