‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ; कल्याणमध्ये खळबळ  
क्राईम

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

kalyan Crime : कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टी येथे राहणाऱ्या सलमा जहागीर खान यांनी पतीसह काही व्यक्तींविरोधात मानसिक त्रास, पाठलाग आणि छेडछाडीचे आरोप करत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पतीने दुसरे लग्न केल्यानंतर आपल्याला घर सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे.

श्वेता झगडे
  • पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ?
  • मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
  • पतीसह काही व्यक्तींवर महिलेचे गंभीर आरोप

kalyan Crime: कल्याण पश्चिमेतील (kalyan Crime) सर्वोदय सृष्टी इमारतीत राहणाऱ्या सलमा जहीर खान यांनी आपल्या पतीसह काही व्यक्तींविरोधात मानसिक त्रास, पाठलाग आणि छेडछाडीचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, आपल्यासह मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीती व्यक्त केली आहे. या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पतीने दुसरे लग्न केल्याचा दावा

सलमा खान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत विवाह केला असून संबंधित महिला त्यांच्या शेजारीच राहते. या कौटुंबिक वादानंतर आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप सलमा यांनी केला आहे. संबंधित महिलेच्या वडिलांकडून आपला पाठलाग केला जात असल्याचा आणि विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या परिस्थितीमुळे आपण आणि आपली मुले सुरक्षित नसल्याची भीती वाटत असल्याचे सलमा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकदा स्वतःला मुलांसह घरात लॉक करून राहावे लागत असल्याचा दावा सलमा खान यांनी केला आहे. आपल्याला किंवा आपल्या मुलांना काही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागू नये, यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘घर सोडण्यासाठी दबाव आणला जातोय’

सध्या राहत असलेले घर सोडून जावे यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप सलमा यांनी केला आहे. पतीने ज्या तरुणीसोबत दुसरे लग्न केले आहे, तिला त्या घरात राहता यावे, या उद्देशाने आपल्याला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार

या संपूर्ण प्रकरणाबाबत सलमा खान यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी प्राथमिक स्वरूपाची नोंद केल्याचे सलमा यांनी सांगितले. आपल्याला आणि मुलांना धोका असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

भारतीय कागदपत्रांबाबतही चौकशीची मागणी

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक व्यक्ती परदेशी नागरिक असल्याचा दावाही सलमा खान यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीकडे भारतातील मतदार ओळखपत्रासह अन्य भारतीय कागदपत्रे कशी आली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र संबंधित व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत किंवा कागदपत्रांबाबत अधिकृत यंत्रणेकडून अद्याप कोणतीही पुष्टी समोर आलेली नाही.

आरोपांची सत्यता तपासानंतर होणार स्पष्ट

या प्रकरणात महिलेने केलेले मानसिक छळ, पाठलाग, छेडछाड, घर सोडण्यासाठी दबाव तसेच नागरिकत्व आणि कागदपत्रांसंदर्भातील दावे हे आरोपांच्या स्वरूपात आहेत. संबंधित व्यक्तींची बाजू आणि पोलिसांकडील तपासाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता पोलिसांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आपल्या आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सलमा खान यांनी केली आहे.

बाईकच्या इंजिनमध्ये Oil Cooler vs Liquid Cooling; दोन्हीमध्ये नेमका फरक काय?

लहान मुलांना बाईकवर नेताना पालकांनी ही चूक टाळावी! पाय अडकण्यापासून हेल्मेटपर्यंत जाणून घ्या Safety Rules

IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट

NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

अल निनोचा धोका, दुष्काळाचे संकट! बदलत्या हवामानानुसार शेतीचे नियोजन करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधवांचे आवाहन