बोपदेव घाट अपघात प्रकरण (फोटो- istockphoto) वानवडी येथील लष्कर न्यायालयाने सुनावली कोठडी
क्राईम

Bopdeo Ghat Accident प्रकरणात मोठी बातमी; चालकाला कोर्टाने थेट...; वाचा सविस्तर

Bopdeo Ghat Accident: प्रतीक मारुती चव्हाण (वय २२, रा. भुलेश्वर गाव, पुरंदर) असे पोलिस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तेजस भागवत
  • बोपदेव घाट प्रकरणातील चालकाला तीन दिवस पोलिस कोठडी

  • वानवडी येथील लष्कर न्यायालयाने सुनावली कोठडी

  • अनियंत्रित टेम्पोच्या धडक दिल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Bopdeo Ghat Accident: बोपदेव घाट रस्त्यावर भरधाव टेम्पो चालवून तीन विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी चालकाला वानवडी येथील लष्कर न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का; तसेच टेम्पो कोणाच्या मालकीचा आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. 

प्रतीक मारुती चव्हाण (वय २२, रा. भुलेश्वर गाव, पुरंदर) असे पोलिस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, ओंकार चंद्रकांत कटके (वय २८, रा. भिवरी, पुरंदर) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास बोपदेव घाट रस्त्यावरील ट्रिनिटी कॉलेजसमोरच्या बसथांब्याजवळ घडली.

माझ्या बाळाला परत आणा, मला कोणाकडून काहीच नको!" बोपदेव घाटातील अपघातात सिद्धेशचा मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा...

आरोपीने घाटातील उतारावर भरधाव आणि निष्काळजीपणे टेम्पो चालवून तक्रारदारांच्या चारचाकीला धडक देऊन बसथांब्यावर उभ्या असलेल्या मुलांना चिरडले. या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी टेम्पोचालकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. हा गंभीर गुन्हा असून, आरोपीने बेदरकारपणे वाहन चालविल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का, त्याने गाडी कोणाकडून आणली होती, या अपघातामागची कारणे काय आहेत, याबाबत तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील डॉ. आम्रपाली कस्तुरे यांनी केला. 

आरोपीने टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने आणि ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याचा दावा केला आहे. मात्र, सीसीटीव्ही चित्रीकरणात तसे निदर्शनास येत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीच्या वतीने अॅड. नीलेश यादव यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Pune Accident: खूप वाईट बातमी! बसस्टॉपवर मुलं उभी अन् ट्रक आला आणि थेट...; 3 जणांचा चिरडून मृत्यू

बोपदेव घाट अपघात प्रकरणातील आरोपी चालकाला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे?

बोपदेव घाट रस्त्यावरील अपघातात तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी टेम्पो चालकाला न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोपदेव घाट अपघात प्रकरणात पोलिसांकडून कोणता तपास सुरू आहे?

आरोपी चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का आणि अपघातग्रस्त टेम्पो नेमका कोणाच्या मालकीचा आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Kho Kho Championship : चार गुणांनी हुकले सुवर्ण! कर्नाटककडून महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव

Winter Health: थंडीत सकाळी अंथरुणातून उठण्याची इच्छा होत नाही? Winter Blues ची 'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका

Rohit Pawar : आधी सुनेत्रा पवारांची माफी मागितली, मग अजितदादांबाबत मोठं विधान! रोहित पवार म्हणाले, 'त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही'

Olympic 2036 चे ऑलिम्पिक भारतात होणार? IOC समोर सादर केला सविस्तर आराखडा; सरकारकडून शर्थीचे प्रयत्न

पुणेकरांची सार्वजनिक वाहतूकीकडे पाठ; मेट्रो अन् बस असूनही खाजगी वाहनांचा वापर जास्त