Megha Dhade Daughter New Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)  
Marathi Cinema

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी

Megha Dhade Daughter New Movie: मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री मेघा धाडे हिची मुलगी साक्षी पावस्कर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. साक्षीचा पहिला चित्रपट ‘गणेश डस्ट टू स्टारडस्ट’ असून तो प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Riddhi Vanne
  • साक्षी पावस्करचे चित्रपटसृष्टीत पदार्पण
  • लेकीसाठी मेघाची भावुक पोस्ट
  • गणेश आचार्य यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट

मेघा धाडेच्या लेकीची सिनेमात एन्ट्री, आईनेच दिली खुशखबरमराठी इंडस्ट्रीत मेघा धाडे हे नाव कुणाला माहित नाही? बिग बॉस असो किंवा तिच्या मालिका, तिने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अनेक वर्षे ती या क्षेत्रात काम करते आहे. आता तिच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या लेकीने पण अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले आहे.ही आनंदाची बातमी मेघानेच स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. Megha Dhade Daughter New Movie:

आईच्या वाटेवर लेक

मेघा धाडेची लेक साक्षी पावस्कर आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिचा पहिला सिनेमा आहे 'गणेश डस्ट टू स्टारडस्ट'. हा सिनेमा प्रसिद्ध डान्स डायरेक्टर गणेश आचार्य यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला त्याट्रेलरमध्ये साक्षीची झलक पाहून सगळेच खुश झाले आहेत. जरी छोटा रोल असला तरी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मेघाची इमोशनल पोस्ट

लेकीच्या पहिल्या सिनेमासाठी मेघा खूपच भावुक झाली. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत लिहिले आहे की, "लाडक्या लेकीचं रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल पडतंय, आशीर्वाद असू द्या.... आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं..."तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट करून साक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत. सगळेजण तिचे अभिनंदन करत आहेत.

सिनेमाबद्दल काय आहे?

'गणेश डस्ट टू स्टारडस्ट' हा सिनेमा V2S Production & Entertainment ने बनवला आहे. याची निर्माती सौंदर्या आहेत आणि दिग्दर्शन स्वतः गणेश आचार्य यांनीच केले आहे. कथा आणि डायलॉग पण गणेश आचार्य आणि दिगंगना सूर्यवंशी यांनी लिहिले आहेत.हा सिनेमा 11 डिसेंबरला थिएटरमध्ये येणार आहे. यात साक्षी पावस्कर बरोबर शिवांशु सोनी, आलोक शॉ, सुकन्या काळण हे कलाकार पण महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गणेश आचार्य यांनी बॉलिवूडमध्ये खूप मोठे नाव कमावले आहे, त्यांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा त्यांच्यासाठी पण खूप स्पेशल आहे. आणि याच सिनेमातून मेघा धाडेच्या लेकीने सुरुवात करणे ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.आता साक्षी मोठ्या पडद्यावर काय कमाल करते हे बघायला सगळे उत्सुक आहेत. आईसारखीच ती पण प्रेक्षकांची मने जिंकेल अशी आशा आहे.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!

Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा