वारंवार नेल एक्स्टेंशन केल्यामुळे नैसर्गिक नखे पातळ, ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात.
नेल एक्स्टेंशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या जेल आणि अॅक्रेलिकमुळे त्वचेची ॲलर्जी तसेच ओलावा अडकल्याने बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो.
नेल एक्स्टेंशन करताना निर्जंतुक उपकरणांचा वापर करणारे सलून निवडा, नखे स्वतः ओढून काढू नका आणि नैसर्गिक नखांना वेळोवेळी विश्रांती द्या.
आजकाल महिलांमध्ये आणि तरुणींमध्ये नेल एक्स्टेंशनची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.प्रत्येक तरुणीला नवीन कलाकृती तिचा नखांवर करू करू घ्यायचीआहे. काही जणं त्यासाठी नेल आर्टिस्ट कडे देखील जातात. तर काही जण घरच्या घरी करण्याचा मार्ग अवलंबतात. लग्नसमारंभ, पार्टी किंवा इतर खास प्रसंगांसाठी नखांना आकर्षक लुक देण्यासाठी नेल एक्स्टेंशन केले जाते. जेल, अॅक्रेलिक आणि इतर प्रकारच्या नेल एक्स्टेंशनमुळे हातांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मात्र, सतत नेल एक्स्टेंशन केल्यामुळे नैसर्गिक नखांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही फॅशन फॉलो करण्यापूर्वी त्याचे संभाव्य दुष्परिणाम जाणून घेणे गरजेचे आहे.
नेल एक्स्टेंशन करताना नैसर्गिक नखांचा वरचा थर घासला जातो. तसेच एक्स्टेंशन काढताना योग्य पद्धत वापरली नाही तर नखांचा थर निघू शकतो. यामुळे नखे पातळ, ठिसूळ आणि कमकुवत होण्याची शक्यता असते. वारंवार असे केल्यास नखांना नुकसान पोहोचू शकते.काही ठराविक कार्यांना तुम्ही नेल आर्ट करणे निवडा. सतत च्या वापरामुळे नैसर्गिक नखांची झीज होऊ शकते.
नेल एक्स्टेंशन आणि नैसर्गिक नखांमध्ये पाणी किंवा ओलावा अडकून राहिल्यास बुरशी वाढू शकते.दररोजच्या कामांमध्ये अडथळा वाढू शकतो.यामुळे नखांचा रंग बदलणे, नखे जाड होणे आणि दुर्गंधी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नखांची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
नेल एक्स्टेंशनसाठी वापरल्या जाणाऱ्या जेल, अॅक्रेलिक आणि चिकटवणाऱ्या पदार्थांमधील रसायनांमुळे काही व्यक्तींना ॲलर्जी होऊ शकते. यामुळे नखांच्या आसपास खाज, लालसरपणा, सूज आणि जळजळ जाणवू शकते.काहीजणांना त्वचेची ऍलर्जी असल्यामुळे देखील हा त्रास जाणवू शकतो.
दिवसभर मोठी कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी नेल एक्स्टेंशन त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे नेल एक्स्टेंशन केल्यानंतर लक्ष देऊन काम करावे.
खूप लांब नेल एक्स्टेंशन केल्यास नखांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. एखाद्या वस्तूला नखे अडकून एक्स्टेंशन ओढले गेल्यास नैसर्गिक नखाला दुखापत होण्याची शक्यता असते. काही वेळा नखे मुळापासून वेगळी होऊ शकतात.
नेल एक्स्टेंशन वारंवार करणे आणि ते चुकीच्या पद्धतीने काढणे यामुळे नखांच्या वाढीच्या भागाला इजा होऊ शकते. परिणामी नखांची वाढ अनियमित होण्याची शक्यता असते.नखांना स्वतःची एक ठराविक वाढ असते पण त्यावर सतत रसायनाचा वापर केलेल्या नेल पोलिश चा वापर केल्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
नेल एक्स्टेंशन करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. नेहमी निर्जंतुक उपकरणांचा वापर करणाऱ्या सलूनची निवड करा. एक्स्टेंशन स्वतः ओढून काढू नका. नखांमध्ये संसर्ग किंवा ॲलर्जीची लक्षणे दिसल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच नखांना वेळोवेळी विश्रांती द्या.
नेल एक्स्टेंशनमुळे हातांचे सौंदर्य वाढत असले तरी त्याचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. फॅशनसोबतच नैसर्गिक नखांचे आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.