सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लास ABC ज्यूस 
लाइफ स्टाइल

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लास ABC ज्यूस, त्वचा केसांसोबतच आरोग्याला होतील भरमसाट फायदे

ABC Juice: आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ABC ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेचा रंग उजळदार होण्यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय रक्त शुद्ध करण्यासाठी बीटचा ज्यूस पिणे फायदेशीर मानले जाते.(फोटो सौजन्य – AI)

सुरुची कदम
  • ABC ज्यूस बनवण्याची कृती?

  • ABC ज्यूस पिण्याचे गुणकारी फायदे?

  • ABC ज्यूसमध्ये कोणते घटक असतात?

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन कायमच केले जाते. त्वचा, केस कायमच चमकदार आणि सुंदर राहावेत, यासाठी वेगवेगळे ज्यूस, फळे, भाज्या आणि स्किन केअर, हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. त्यातील अतिशय लोकप्रिय पदार्थ ABC ज्यूस. ABC म्हणजे सफरचंद, बीट, गाजर. घरच्या घरी तीन पदार्थांपासून बनवलेला हेल्दी टेस्टी ज्यूस शरीर, त्वचा आणि केसांसाठी खूप जास्त गुणकारी ठरतो. चवीला गोडसर लागणारा ज्यूस नियमित किंवा आठवड्यातून दोनदा , तीनदा प्यायल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. सफरचंद, बीट आणि गाजर यांमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटि ऑक्सिडंट्स आढळून येतात. त्यामुळे हा पदार्थ बनवावे सुद्धा अतिशय सोपे आहे.

ABC ज्यूस बनवण्याची सोपी रेसिपी:

ABC ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम सफरचंद, गाजर आणि बीट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बीट आणि गाजरची साल काढून मध्यम आकारात तुकडे करा. सफरचंदचे बारीक तुकडे करून झाल्यानंतर त्यातील बिया काढा. मिक्सरच्या भांड्यात गाजरचे तुकडे, बीटचे तुकडे आणि सफरचंद घालून त्यात थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्या. हा ज्यूस गळण्याऐवजी आहे तसाच थेट प्यावा. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. ज्यूस गाळून प्यायल्यास त्यातील फायबर शरीराला लागणार नाहीत.

ज्यूस पिताना सगळ्यात शेवटी त्यात लिंबाचा रस टाकल्यास चव मस्त लागेल. पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेला ABC ज्यूस शरीरासाठी वरदान मानला जातो. सफरचंदामध्ये फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक असतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि फायबर युक्त घटकांमुळे आतड्यांची हालचाल सुलभ चालू राहते. बीटमध्ये फोलेट, पोटॅशियम आणि नैसर्गिक नायट्रेट्स युक्त घटक असतात. नायट्रेट्समुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असते, त्यामुळे रूपांतर विटामिन ए होते. डोळ्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी कायमच गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. या तिन्ही पदार्थांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्यूसमध्ये पाणी असल्यामुळे शरीराला द्रवपदार्थ आवश्यक प्रमाणात मिळतात. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मिक्स ज्यूस पिणे फायदेशीर मानले जाते.

Old Monk High Court Order : ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?

अकोल्यात कॉमन ब्रँडिंगअभावी 260 केंद्रांना फटका; सेवा केंद्रांच्या मनमानीला बसणार चाप

Nashik Crime News: प्रेमाच्या वादातून थेट हत्येचा प्रयत्न! नाशिकरोडमध्ये संशयित पोलिसांच्या जाळ्यात

वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर हल्ला,  कुऱ्हाडीने मारण्याची धमकी; नेमकं काय घडलं?

Jay Jay Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट! शंकरने रुहीसमोर ठेवली संसार की स्वामीभक्ती निवडण्याची अट