Health news(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Health news: गर्भवती महिला आणि नव्या पालकांचा ‘गुगल डॉक्टर’वर वाढता विश्वास, तज्ज्ञांच्या सल्ल्या घेण्यास टाळाटाळ

Health news: गर्भधारणेदरम्यान जाणवणारी शारीरिक लक्षणे असोत किंवा नवजात बाळाच्या आरोग्याशी संबंधित चिंता, अनेक महिला आणि नवे पालक डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी गुगलवर माहिती शोधतात. मात्र, इंटरनेटवरील प्रत्येक माहिती अचूक किंवा सर्वांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राखी वाघ यांनी ऑनलाइन माहितीच्या आधारे स्वतःच उपचार करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

siddhi
  • गर्भधारणा आणि नवजात बाळाच्या आरोग्याविषयी इंटरनेटवरील माहितीवर अवलंबून राहण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

  • ऑनलाइन माहितीच्या आधारे औषधे बदलणे, पूरक आहार सुरू करणे किंवा घरगुती उपचार करणे टाळा.

  • विश्वासार्ह आरोग्यविषयक संकेतस्थळांचा वापर करा आणि बाळाला ताप, दूध पिण्यात अडचण किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

गर्भधारणेदरम्यान जाणवणारी एखादी छोटीशी शारीरिक तक्रार असो किंवा नवजात बाळाच्या आरोग्याशी संबंधित चिंता, आजकाल अनेक महिला आणि पालक डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी इंटरनेटवर माहिती शोधताना दिसतात. पोटदुखी, डोकेदुखी, बाळाच्या हालचाली, प्रसूतीची लक्षणे, स्तनपान किंवा बाळाच्या झोपेच्या सवयी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गुगलवर शोधली जातात. मात्र, इंटरनेटवर उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती अचूक आणि प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असेलच असे नाही. त्यामुळे ‘गुगल डॉक्टर’च्या सल्ल्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे.असे डॉ. राखी वाघ यांनी सांगितले. डॉ. राखी वाघ, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ,मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे

नव्या पालकांनी इंटरनेटवरून माहिती मिळवून विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे?

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे मळमळ, थकवा, पोटात दुखणे, डोकेदुखी किंवा शरीरावर सूज येणे यांसारख्या तक्रारी जाणवू शकतात. अशा वेळी अनेक महिला या लक्षणांची कारणे इंटरनेटवर शोधतात. मात्र, एकाच लक्षणामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. इंटरनेटवर गंभीर आजारांची माहिती वाचल्यानंतर सामान्य शारीरिक बदलांबाबतही अनावश्यक भीती निर्माण होऊ शकते. काही वेळा गंभीर लक्षणांकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.नव्या पालकांमध्येही इंटरनेटवरून माहिती मिळवण्याचे प्रमाण वाढले आहे. बाळाला किती वेळा दूध पाजावे, त्याची झोपण्याची पद्धत कशी असावी, त्वचेवर पुरळ आल्यास काय करावे किंवा बाळाच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत बदल झाल्यास काय करावे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पालक ऑनलाइन शोधतात. सोशल मीडियावर इतर पालकांनी सांगितलेले अनुभव आणि घरगुती उपायही अनेकदा वापरले जातात. मात्र, एका बाळासाठी उपयुक्त ठरलेला उपाय दुसऱ्या बाळासाठी योग्य किंवा सुरक्षित असेलच असे नाही. प्रत्येक बाळाची प्रकृती आणि आरोग्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात.

ऑनलाइन माहितीच्या आधारे स्वतःच उपचार का करू नयेत?

ऑनलाइन माहितीच्या आधारे स्वतःच उपचार करण्याची प्रवृत्ती अधिक चिंताजनक आहे. काही पालक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बदलतात, पूरक आहार सुरू करतात किंवा घरगुती उपायांचा अवलंब करतात. गर्भवती महिला इंटरनेटवरील माहिती वाचून आहारावर अनावश्यक निर्बंध घालतात. अशा निर्णयांचा आईच्या तसेच बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. बाळाला ताप येणे, दूध कमी पिणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा असामान्यपणे सुस्त वाटणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डॉक्टरांची प्रतिक्रिया काय आहे ?

डॉ. राखी वाघ सांगितले की, आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे चुकीचे नाही. मात्र, माहितीचा स्रोत विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त रुग्णालये, सरकारी आरोग्यविषयक संकेतस्थळे, वैद्यकीय संघटना आणि पात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीला प्राधान्य द्यावे. त्वरित परिणाम मिळण्याची हमी देणारी, डॉक्टरांनी दिलेली औषधे बंद करण्याचा सल्ला देणारी किंवा अप्रमाणित उपचारपद्धतींचा प्रचार करणारी माहिती टाळावी.

इंटरनेट हे आरोग्यविषयक माहिती मिळवण्याचे उपयुक्त माध्यम असले तरी ते डॉक्टरांच्या प्रत्यक्ष तपासणीला पर्याय ठरू शकत नाही. गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन या दोन्ही टप्प्यांमध्ये योग्य वेळी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे इंटरनेटवर माहिती शोधताना घाबरून जाण्याऐवजी मनात निर्माण झालेले प्रश्न स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा बालरोगतज्ज्ञांना विचारावेत. ऑनलाइन माहितीचा वापर जागरूकता वाढवण्यासाठी करावा, उपचारांचा निर्णय घेण्यासाठी नाही

Mrudgandha Awards 2026 : ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; पं. सुरेश तळवलकरांसह दिग्गज कलाकारांचा गौरव

Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली

Hague Conference : दुसऱ्या महायुद्धातील 'ते' विषारी बॉम्ब आजही चीनसाठी जीवघेणे; हेगमध्ये 40 देशांसमोर चीनने उघडली जपानविरुद्ध आघाडी

Sambhajinagar ZP News : संभाजीनगर जिल्हा परिषदेला २१५ कोटींचा निधी; डिसेंबरपासून विकासकामांना सुरुवात

Kalyan News: आई रागावली म्हणून सहा वर्षांचा रोशन घरातून निघाला; लोकल पकडून थेट खडवली गाठली, १० तासांनी पोलिसांनी शोधले!