Lab grown diamond(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Lab grown diamond: लॅब ग्रोन डायमंडला तरुणाईची पसंती, कमी किमतीत मिळतोय हिऱ्यांमध्ये आकर्षक पर्याय!

Lab grown diamond: लग्नसराईच्या काळात लॅब ग्रोन डायमंड दागिन्यांना वाढती पसंती मिळत आहे. नैसर्गिक हिऱ्यांसारखी चमक आणि तुलनेने कमी किंमत यामुळे तरुणाई या पर्यायाकडे आकर्षित होत आहे. जाणून घ्या लॅब ग्रोन डायमंडचे फायदे आणि खरेदी करताना घ्यायची काळजी.

siddhi berde
  • लॅब ग्रोन डायमंड हे प्रयोगशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले जातात आणि त्यांची रासायनिक रचना नैसर्गिक हिऱ्यांसारखीच असते.

  • नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेत कमी किंमत आणि आकर्षक चमक यामुळे लग्नाच्या दागिन्यांसाठी लॅब ग्रोन डायमंड लोकप्रिय ठरत आहेत.

  • लॅब ग्रोन डायमंड खरेदी करताना प्रमाणपत्र, कट, कलर, क्लॅरिटी, कॅरेट आणि पुनर्विक्री मूल्य यांची माहिती तपासणे आवश्यक आहे.

आजकाल दागिन्यांच्या बाजारपेठेत लॅब ग्रोन डायमंडचा (Lab Grown Diamond) ट्रेंड वेगाने वाढताना दिसत आहे.त्याचबरोबर येत्या लग्नसराई च्या काळात कोणत्या प्रकारचे हिरे विकत घ्यायचे प्रश्न सर्वांचं पडतो.लॅब ग्रोन डायमंड बद्दल जाणून घ्यायची आहे. विशेषतः तरुणाई आणि आधुनिक विचारसरणी असलेल्या ग्राहकांकडून या हिऱ्यांना पसंती दिली जात आहे. नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणेच चमक आणि आकर्षक लूक असलेले हे हिरे तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने अनेक जण दागिने खरेदी करताना त्यांचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे सध्या ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये लॅब ग्रोन डायमंडची चर्चा सुरू आहे.

लॅब ग्रोन डायमंड काय असतात?

लॅब ग्रोन डायमंड म्हणजे प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात तयार केलेले हिरे. हे हिरे कृत्रिम किंवा नकली नसून त्यांची रासायनिक रचना, स्फटिकांची संरचना आणि भौतिक गुणधर्म नैसर्गिक हिऱ्यांसारखेच असतात. नैसर्गिक हिरे पृथ्वीच्या पोटात लाखो वर्षांच्या कालावधीत तयार होतात, तर लॅब ग्रोन डायमंड आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काही आठवड्यांत तयार करता येतात.तसेच तुम्हाला हवे असलेल्या आकारात आणि रंगात उपलब्ध करून मिळतात.

कोणत्या पद्धतीने हे हिरे तयार केले जातात?

लॅब ग्रोन डायमंड तयार करण्यासाठी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात. पहिली म्हणजे एचपीएचटी (HPHT) आणि दुसरी म्हणजे सीव्हीडी (CVD). एचपीएचटी पद्धतीमध्ये प्रचंड दाब आणि उच्च तापमानाचा वापर करून हिरा तयार केला जातो. तर सीव्हीडी पद्धतीमध्ये कार्बनयुक्त वायूंच्या साहाय्याने विशिष्ट वातावरणात हिऱ्याचे स्फटिक तयार केले जातात. या दोन्ही पद्धतींमधून तयार होणारे हिरे नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणेच दिसतात.तामध्ये तुम्ही कोणताही फरक शोधू शकणार नाही.

लॅब ग्रोन डायमंडचे फायदे जाणून घ्या.

लॅब ग्रोन डायमंडचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे त्यांची किंमत. समान आकार आणि गुणवत्तेच्या नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेत हे हिरे साधारणपणे स्वस्त असतात. त्यामुळे कमी बजेटमध्ये मोठ्या आकाराचा आणि आकर्षक हिरा खरेदी करणे शक्य होते. याशिवाय, पारंपरिक हिरा खाणकामाची गरज नसल्यामुळे जमिनीचे उत्खनन टाळता येते. मात्र, त्यांची निर्मिती करताना किती ऊर्जा वापरली जाते, यावर पर्यावरणीय परिणाम अवलंबून असतो.

कोणत्या दागिन्यांमध्ये वापरले जातात?

लॅब ग्रोन डायमंडचा वापर अंगठी, नेकलेस, कानातले, ब्रेसलेट, पेंडंट आणि मंगळसूत्र अशा विविध दागिन्यांमध्ये केला जातो. विशेषतः एंगेजमेंट रिंग आणि लग्नाच्या दागिन्यांसाठी तरुण ग्राहक या पर्यायाचा विचार करत आहेत.या डायमंडचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनात देखील करू शकता.

खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

लॅब ग्रोन डायमंड खरेदी करताना त्याचे प्रमाणपत्र, कट, कलर, क्लॅरिटी आणि कॅरेट यांची माहिती तपासावी. तसेच तो नैसर्गिक हिरा नसून लॅब ग्रोन डायमंड असल्याचे विक्रेत्याकडून स्पष्ट करून घ्यावे. त्याची पुनर्विक्री किंमत नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा कमी असू शकते, हेही लक्षात ठेवावे.भविष्यात लॅब ग्रोन डायमंड विकत घेण्याकडे तरुण पिढी चा काळ वाढेल त्यांनी विकत घेताना काळजीपूर्वक घ्यावा.

एकूणच, आकर्षक चमक, तुलनेने कमी किंमत आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅब ग्रोन डायमंड दागिन्यांच्या बाजारपेठेत लोकप्रिय पर्याय ठरत आहेत.

छोटी MINI,मोठी झेप! BMW ग्रुपच्या विक्रीत मोठा वाटा मिळवण्याची तयारी

Kaal Bhairav Jayanti 2026: कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व

Bigg Boss 20 Eviction: ‘बिग बॉस २०’मध्ये १२व्या आठवड्यात मोठा धक्का! माही विज नव्हे, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

Bank UPI Transaction : UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय; काय परिणाम होणार?

दागिने घडवण्याचे काम मिळाले आणि कोट्यवधींचा ऐवज घेऊन झाले गायब! रविवार पेठेत खळबळ