Weight Loss Tips Diet photo- AI
लाइफ स्टाइल

Weight Loss Tips: वेट लॉस करायचंय, पण डाएट कसं असावं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खा 'हे' पदार्थ, वाचा Diet प्लॅन

Weight Loss Tips Diet: वजन कमी करण्यासाठी आहार हा सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे, जाणून घ्या.

Priyanka Mundinkeri
  • वजन कमी करण्याचा सोपा फॉर्म्युला

  • नाश्ता, लंच अन् डिनरसाठी निवडा हे हेल्दी पदार्थ

  • सकाळपासून रात्रीपर्यंत असा ठेवा आहार

Weight Loss Tips: आजकाल अनहेल्दी लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालीचा अभाव यामुळे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. परंतु,

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची किंवा जेवण टाळण्याची गरज नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि हेल्दी लाइफस्टाइलचा अवलंब करून वजन कमी करता येते. यासाठी, दररोच्या आहारात प्रथिने, फायबर, फळे, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत काय खावे, आणि कोणते पदार्थ टाळावेत जाणून घेऊयात.

सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्या

सकाळी उठल्यावर एक ग्लास साधे पाणी प्यायल्याने शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही लिंबू पाणी देखील पिऊ शकता. मात्र, लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी थेट कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दिवसभरातील आहार आणि कॅलरी यांचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नाश्त्यामध्ये प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खा

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना सकाळचा नाश्ता टाळू नका. प्रथिने आणि फायबरने भरपूर असलेला नाश्ता करा. यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटेल आणि भूक कमी लागेल. तुम्ही व्हेजिटेबल ओट्स, मूग डाळ चीला, उकडलेली अंडी, व्हेजिटेबल पोहे, दही, फळे आणि स्पाउट्स खाऊ शकता. या पदार्थांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.

मधल्या वेळेत हंगामी फळे खा

सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागल्यास, जंक फूड किंवा पॅकबंद स्नॅक्सऐवजी मोसमी फळे खा. सफरचंद, पेरू, संत्री, पपई आणि नाशपाती यांसारखी फळे उत्तम पर्याय आहेत. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. या फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा संपूर्ण फळे खाणे अधिक हेल्दी आहे.

दुपारच्या जेवणात संतुलित आहार घ्या

दुपारच्या जेवणातून शरीराला पुरेसे पोषण मिळायला हवे. वजन कमी करण्यासाठी चराती किंवा भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. फक्त त्यांच्या प्रमाणाकडे लक्ष द्या. तुम्ही दुपारच्या जेवणात, १-२ पोळ्या किंवा मध्यम प्रमाणात भात, एक वाटी डाळ किंवा राजमा, एक वाटी भाजी, सॅलड आणि एक वाटी दही खाऊ शकता. यामुळे तुमचा आहारत संतुलित राहिल.

संध्याकाळी हेल्दी स्नॅक्स खा

संध्याकाळी चहाबरोबर बिस्किटे, चिवडा, समोसे आणि भजी खाल्ल्याने, विशेषतः जास्त प्रमाणात सेवन केल्यास, वजन वाढू शकते. त्याऐवजी पौष्टिक नाश्त्याची निवड करा.संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही भाजलेले चणे, मखाणा, मूठभर बदाम,स्प्राउट्स चाट आणि साखरेशिवाय चहा पिऊ शकता.

रात्रीच्या जेवणात हलके आणि पौष्टिक अन्न खा

रात्रीचे जेवण संतुलित आणि तुमच्या भुकेनुसार असावे. त्यात प्रथिने, भाज्या आणि योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचा समावेश असावा. म्हणून तुम्ही डाळी आणि भाज्या, पनीर किंवा टोफू

मिक्स भाज्या, एक किंवा दोन भाकरी आणि सॅलड असे संतुलित आहार खाऊ शकता. रात्री जास्त तळलेले पदार्थ आणि जड जेवण खाणे टाळा. तसेच, झोपण्यापूर्वी खाण्याची सवय बदला.

बाईकच्या इंजिनमध्ये Short Stroke की Long Stroke? कोणते इंजिन जास्त दमदार?

लॅम्बोर्गिनी Temerario Spyder साठी ब्रिजस्टोनचे खास टायर्स; 20 आणि 21 इंचांच्या 3 प्रकारच्या टायर्सची सुविधा

Pune Crime: पुण्यात खळबळ! बँकेबाहेर बेवारस बॅग अन् पोलिसांची धावपळ, बॉम्बशोधक पथकाची तपासणी

Breaking News : जगभरात उपासमारीचे संकट गडद होणार; संयुक्त राष्ट्रांचा इशारा, आफ्रिकेतील काही भागात तीव्र दुष्काळाचा धोका

Man Taluka Water Issue : राजेवाडी तलावातील पाणी उपसा सुरूच; मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ