मेटाबॉलिझम म्हणजे शरीर अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याची नैसर्गिक प्रक्रिया.
प्रोटीनयुक्त आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि ७ ते ९ तासांची झोप शरीराचे चयापचय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
संतुलित आहार, योगासने आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन या ६ सवयींचा दिनचर्येत समावेश करा.
आपण अनेकदा वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर फिट ठेवण्यासाठी मेटाबॉलिझम (Metabolism) हा शब्द ऐकतो. पण मेटाबॉलिझम म्हणजे नेमके काय आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, हे अनेकांना माहीत नसते. मेटाबॉलिझम म्हणजेच मराठीत 'चयापचय क्रिया' ती प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते. शरीरात अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी ज्या नैसर्गिक प्रक्रिया घडतात, त्यांना मेटाबॉलिझम म्हणतात.एखादी व्यक्ती ही जाड आसन किंवा बारीक असणं हे त्याचा metabolism वर असते. या ऊर्जेचा वापर शरीर श्वास घेणे, हृदयाचे ठोके सुरू ठेवणे, अन्न पचवणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि दैनंदिन कामे करण्यासाठी करते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मेटाबॉलिझम महत्त्वाचा असतो.
मेटाबॉलिझमचा वेग प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असतो. वय, शरीराची रचना, स्नायूंचे प्रमाण, हार्मोन्स आणि शारीरिक हालचाली यांचा त्यावर परिणाम होतो. काही व्यक्तींना मेटाबॉलिझमचा वेग कमी असल्यास वजन नियंत्रित ठेवणे कठीण जाऊ शकते. तसेच थकवा जाणवणे किंवा वजन वाढणे यामागे इतरही कारणे असू शकतात. त्यामुळे केवळ मेटाबॉलिझम कमी असल्यामुळे वजन वाढते, असे समजणे चुकीचे आहे.
आहारात डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, अंडी आणि सुका मेवा यांचा समावेश करा. प्रोटीनमुळे स्नायूंचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा योगासने करा.दिवसातील थोडा वेळ बाजूलकडा ज्याने तुम्हाला व्यायाम करायला देखील मिळेल. याशिवाय स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने स्नायूंचे प्रमाण टिकवण्यास मदत होते.
दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.
दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. अपुऱ्या झोपेमुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो.ज्यामुळे आपल्या शरीराची कार्य पद्धती बिघडते
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.सर्वप्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे metabollism सुधारण्यास मदत होते त्यासाठी नियमित योग्य आहाराची गरज असते.
सततच्या ताणाचा शरीरावर परिणाम होतो.ज्याने आपल्या शरीराची कार्ये देखील मागे पडतात. आपल्या संपूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे ध्यानधारणा, योगासने आणि आवडत्या छंदांसाठी वेळ काढा.
थोडक्यात सांगायचे तर, मेटाबॉलिझम निरोगी ठेवण्यासाठी कोणतेही जादुई पेय किंवा औषध आवश्यक नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगल्या सवयी यामुळे शरीराचे चयापचय व्यवस्थित राहण्यास मदत होते.ह्यामध्ये तुमच्या दररोज खाण्याच्या सवयी अवलंबून असतात.