वाहनांच्या शोरूमला भीषण आग; 4 गाड्या जळून खाक, अग्निशमन दलाने काही क्षणातच... 
महाराष्ट्र

कराडच्या सैदापूर येथील चायनीज सेंटरला भीषण आग; 1.80 लाखाचे नुकसान, रात्री दुकान बंद केले अन् नंतर...

ज्ञानेश्वर कुंभार यांचे डी. के. चायनीज बिर्याणी कॉर्नर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दिवसभर हॉटेल सुरू होते. रात्री उशिरा ज्ञानेश्वर कुंभार यांनी ते बंद केले. त्यानंतर ते घरी निघून गेले. पहाटे या हॉटेलला अचानक आग लागली.

कृपादान आवळे

कराड : सैदापूर (ता.कराड) येथे ओम साई कॉम्प्लेक्स इमारतीत चायनीज सेंटर हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक साहित्य या आगीत जळून खाक झाले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याबाबत ज्ञानेश्वर कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर येथील जे. के. पेट्रोल पंपाजवळ ओम साई कॉम्प्लेक्स असून, त्याठिकाणी ज्ञानेश्वर कुंभार यांचे डी. के. चायनीज बिर्याणी कॉर्नर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दिवसभर हॉटेल सुरू होते. रात्री उशिरा ज्ञानेश्वर कुंभार यांनी ते बंद केले. त्यानंतर ते घरी निघून गेले. पहाटे या हॉटेलला अचानक आग लागली. आगीत हॉटेलमधील 8 प्लास्टिकचे टेबल, 32 खुर्च्या, स्वयंपाकगृहातील भांडी, फ्रिज, डायनिंग हॉलमधील लाईट बोर्ड, पार्टिशन केलेल्या स्लायडिंग खिडक्या, अंतर्गत शोसाठी केलेला पीओपी डिझाईन, मैदा, नुडल्सचे पोते तसेच तांदळाची पोती जळून 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ज्ञानेश्वर कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, चायनीज सेंटरला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये हॉटेलमालक कुंभार यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेलला ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शनिवार पेठेतही लागली होती आग

यापूर्वी, कराडच्या शनिवार पेठेतील खाजा खिजर दर्गा परिसरात पान शॉप साहित्याच्या होलसेल दुकानाला भीषण आग लागली होती. त्यावेळी त्या आगीत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत जमीर आमिन खान (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral