फोटो सौजन्य AI  
नागपूर

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?

Nagpur News : नागपूरच्या फुटबॉलला मोठी परंपरा लाभली असली तरी सध्या स्थानिक पातळीवरील सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धांच्या संधी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या व्यासपीठाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नवोदित खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि उत्साह असूनही त्यांना योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण संधी मिळणे गरजेचे आहे.

Chaitanya Pisal
  • पंजाबच्या मिनर्वाने काय बदलले
  • खेळाडू घडतात कि केवळ संघ तयार होतात
  • माजी खेळाडूंच्या नजरेतून समस्या

Nagpur News : संध्याकाळ होताच उपराजधानीतील अनेक मैदानांवर एकच दृश्य पाहायला मिळते. हातात फुटबॉल घेऊन धावणारी मुले, घाम गाळणारे युवा खेळाडू आणि मैदानाच्या कडेला उभे राहून मुलांची स्वप्ने पाहणारे पालक. नागपूर-कामठीमध्ये फुटबॉल नवा खेळ नाही. या खेळाची मोठी परंपरा, क्लब संस्कृती, खेळाडू आणि उत्साहही आहे. मात्र या मैदानांवरून देशाच्या सर्वोच्च फुटबॉल व्यवस्थेपर्यंत किती खेळाडू पोहोचले, हा प्रश्न विचारला की चित्र अचानक बदलते. याच प्रश्नातून नागपूरच्या फुटबॉल व्यवस्थेची ही पाहणी सुरू झाली.

'नवभारत' च्या पाहणीत शहरात सुमारे ८० हून अधिक क्लब नोंदणीकृत असल्याचे समोर आले. हजारो खेळाडू विविध स्तरांवर प्रशिक्षण घेत आहेत. जिल्हास्तरावर नागपूरच्या संघाने मागील अनेक वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. आंतरजिल्हा स्पर्धांमध्येही नागपूर आघाडीच्या संघांमध्ये राहिले आहे. असे असतानाही राष्ट्रीय संघ, आयएसएल आणि मोठ्या व्यावसायिक क्लबपर्यंत पोहोचणाऱ्या खेळाडूंची संख्या अत्यंत मर्यादित आहे. या प्रवासातील सर्वात मोठी अडचण प्रतिभेची नसून, सामान्य खेळाडूला मैदानापासून राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचविणाऱ्या मार्गाची आहे.

पंजाबच्या मिनर्वाने काय बदलले

भारतीय फुटबॉलमध्ये पंजाबची मिनेर्वा अकादमी एक उदाहरण म्हणून समोर येते. या अकादमीने केवळ स्पर्धा जिंकण्यावर भर न देता खेळाडू घडविण्याची संपूर्ण प्रक्रिया विकसित केली, कमी वयात प्रतिभा ओळखणे, निवासी प्रशिक्षण, शिक्षणासोबत खेळ, फिटनेस, पोषण, व्हिडिओ विश्लेषण आणि सातत्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव-या संपूर्ण मॉडेलमुळे खेळाडूंना दीर्घ प्रवासासाठी तयार केले जाते.

नागपूर आणि अशा यशस्वी मॉडेलमधील सर्वात मोठा फरक याच ठिकाणी दिसून येतो. नागपुरात अनेक खासगी अकादमी आपापल्या पातळीवर चांगले काम करत आहेत. मात्र शहरस्तरावर १०-१२ वर्षांच्या वयापासून खेळाडूची ओळख करून पुढील ८-१० वर्षांचे नियोजन करून त्याला घडविणारी सामायिक व्यवस्था अद्याप दिसत नाही.

खेळाडू घडतात कि केवळ संघ तयार होतात

फुटबॉल तज्ज्ञांच्या मते, एखाद्या शहराचे यश तेथे किती स्पर्धा होतात यावर ठरत नाही, तर तेथून किती खेळाडू उच्च स्तरावर पोहोचतात यावर ठरते, नागपुरात स्पधांची कमतरता नाही. शालेय स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धा आणि क्लब सामने नियमित होतात. मात्र स्पर्धेनंतर खेळाडूची पुढची पायरी काय, हा प्रश्न कायम आहे.

खेळाडूच्या कामगिरीचा डेटा तयार केला जातो का? त्याच्या कमतरतांवर स्वतंत्रपणे काम केले जाते का? त्याला चांगल्या क्लब आणि राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचण्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था आहे का? याच ठिकाणी सर्वात मोठा फरक दिसून येतो.

माजी खेळाडूंच्या नजरेतून समस्या

८८ माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मते, नागपुरात क्षमतेची कमतरता नाही. येथून अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत, मात्र सातत्याने खेळाडू घडविणारी व्यवस्था विकसित होऊ शकलेली नाही. फुटबॉलसाठी शहरात अनुभवाची कमतरता नाही. मात्र या अनुभवाचा उपयोग खेळाडू विकासाचे नियोजन करण्यासाठी किती केला जात आहे, हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे माजी खेळाडूचे मत आहे.

Sury Ghar योजनेचा महाराष्ट्रात विक्रम! 9 लाखांहून अधिक घरांवर सोलर पॅनल, 8 लाख लाभार्थ्यांना लाभ

बाईकच्या इंजिनमध्ये Oil Cooler vs Liquid Cooling; दोन्हीमध्ये नेमका फरक काय?

लहान मुलांना बाईकवर नेताना पालकांनी ही चूक टाळावी! पाय अडकण्यापासून हेल्मेटपर्यंत जाणून घ्या Safety Rules

IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट

NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी