नाशिक महापालिकेने रस्त्यावर फलक लावणाऱ्या दादा व साहेबांविरोधात केली कारवाई (फोटो - सोशल मीडिया)  
नाशिक

पुण्यानंतर नाशिकच्या महापालिकेचा फ्लेक्स लावणाऱ्यांना दणका! होर्डिंग्जवरील दादा, भाऊ, साहेब रस्त्यावर

नाशिक महापालिकेने शहर विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई सुरू केली आहे. शहरातील सहाही विभागांत एकाच वेळी मोहीम राबवून जाहिरातींचे फलक हटवण्यात आले.

प्रीति माने
  • पुण्यानंतर नाशिकमध्येही फ्लेक्स उभारण्यांवर कारवाई

  • नाशिक महापालिकेची जाहिरातबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई

  • सहा विभागात एकाच वेळी कारवाईल जोर

Nashik NMC Flex Campaign : नाशिक : पुणे महापालिकेने शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकबाजांविरूद्ध मोहीम हाती घेवून त्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांनाही हिसका दिला आहे. याच पावलावर पाऊल ठेवत नाशिक महापालिकेने शहरातील मार्गदर्शक फलकांवर जाहिरातबाजी करणाऱ्या दादा. भाऊ, अण्णा, साहेबांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहरातील सहाही विभागात एकाच वेळी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत दिवसभरातून फलक उतरविण्यात आले आहेत. महापौर हिमगौरी आडके यांनी या कारवाईचे स्वागत करून विद्रुपीकरण खपवून न घेण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील रस्ते, चौक, गल्ली-बोळात राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या फलकांचे पेव फुटले असून, त्यातून शहरातील वाहतूक बेटे, तसेच मार्गदर्शक फलकही सुटलेले नाहीत. सर्वत्र दादा, भाऊ, साहेबांचे वास्तव्य दिसून येत असून, त्यामुळे विद्रुपीकरणाबरोबरच लहान मोठे अपघातही होऊ लागले आहेत. सणासुदीच्या दिवसात लावलेले फलक अद्यापही कायम आहेत. त्यात आता नगरसेवकांच्या नवनियुक्त स्वीकृत शषुभेच्छांच्या फलकांची भर पडली आहे.

Political News : 'संदीप देशपांडेंच्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा...'; निलेश राणेंची मागणी

नाशिक महापालिकेकडून वेळोवेळी फ्लेक्सविरूद्ध मोहीम हाती घेण्यात आली असली तरी, त्यानंतर नवनवीन फलके झळकू लागली आहेत. अनधिकृत चमकोगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असली तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ही कारवाई कागदोपत्री ठरली आहे. सध्या शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामे सुरू असून, अगोदरच रस्ते बंद आहेत, त्यात फळकांनी रस्ते वेढले जाता असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे पाहून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले

गुरूवारी (दि.२६) शहरातील सहाही विभागातील प्रमुख रस्ते, वाहतूक बेटे, मार्गदर्शक फलकांवर लावण्यात आलेले फलक क्रेनच्या सहाय्याने उत्तरविण्यात आले. सकाळपासून सुरू असलेली ही मोहीम सायंकाळपर्यंत कायम होती. यापुढे ही मोहीम दररोज सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्ता सुवर्णा दखणे यांनी दिली आहे.

नाशिक महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात मोहीम का सुरू केली?

शहरातील रस्ते, चौक, वाहतूक बेटे आणि मार्गदर्शक फलकांवर अनधिकृत जाहिराती लावून शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने महापालिकेने ही मोहीम सुरू केली आहे.

नाशिकमध्ये अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई कुठे करण्यात आली?

शहरातील सहाही विभागांमधील प्रमुख रस्ते, वाहतूक बेटे आणि मार्गदर्शक फलकांवर लावलेले अनधिकृत फलक हटवण्यात आले.

नाशिक महापालिकेची अनधिकृत फ्लेक्सविरोधातील मोहीम किती दिवस सुरू राहणार आहे?

अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या माहितीनुसार, अनधिकृत फलक हटवण्याची ही मोहीम यापुढे दररोज सुरू राहणार आहे.

Cheapest Gold Rate Across Indian : भारतात सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळतं? या राज्यांची चर्चा; 22K, 24K वर आहेत आकर्षक ऑफर्स?

Fit India Sunday on Cycle : पुण्यात 'संडे ऑन सायकल'चा शतकमहोत्सव; 50 हजार सायकलप्रेमी सहभागी होणार

Delimitation Bill Approved : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला हिरवा कंदील; राज्यांतील जागांमध्ये ५०% वाढ

पुण्यनगरीत रंगणार Table Tennis चा थरार! 'या' देशांचे खेळाडू होणार सहभागी, विजेत्याला...

Buldhana: मंजुरी मिळाली, पण खात्यात पैसेच नाहीत; बुलढाण्यात ५,१३७ शेतकरी मदतीपासून वंचित, अग्रिम अनुदानाच्या वाटपात तांत्रिक अडथळे