क्रीडा संकुलाच्या नावावरून वसई-विरार महापालिकेत मोठा राडा! कोणाच्या बाजूने किती पडली मते? ( सौजन्य - सोशल मीडिया )
पालघर

Vasai Virar Sports Complex : क्रीडा संकुलाच्या नावावरून वसई-विरार महापालिकेत मोठा राडा! कोणाच्या बाजूने किती पडली मते?

Vasai Virar Sports Complex : वसई-विरार पश्चिमेतील बोळींज म्हाडा मैदानावरील क्रीडा संकुलाला लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे नाव देण्याचा ठराव बहुजन विकास आघाडीने (बविआ) ६८ विरुद्ध ३६ मतांनी बहुमताने संमत करून घेतला.

Ankita Karangutkar
  • क्रीडा संकुल नामकरणावरून सभागृहात रणधुमाळी!

  • भाजपच्या ३६ मतांना मागे टाकत बविआचा ठराव पास

  • पाहा नेमके काय घडले

Vasai Virar Sports Complex : वसई-विरार पश्चिमेतील बोळींज म्हाडा मैदानावरील बहुचर्चित क्रीडा संकुलाला लोकनेते हितेंद्र ठाकूर (अप्पा) यांचे नाव देण्याचा ठराव बहुजन विकास आघाडीने (बविआ) बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. यावरून सत्ताधारी बविआ आणि भाजपमध्ये सभागृहात जोरदार राजकीय वाद सुरु झाला आहे.

बविआ आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष

वसई-विरार शहर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर एकूण १३ विषय होते. मात्र संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष तेराव्या क्रमांकावरील क्रीडा संकुल नामकरणाच्या विषयाकडे लागले होते. तब्बल आठ वर्षांपासून रखडलेल्या या अद्ययावत संकुलाचे काम अपूर्ण असतानाच ३ ऑक्टोबर २०२६ रोजी घाईघाईने उद्घाटन केल्यावरून यापूर्वीही बविआ आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. त्यानंतर आता संकुलाला कोणाचे नाव द्यायचे, हा मुद्दा दोन्ही पक्षांसाठी राजकीय प्रतिष्ठेचा बनला होता.

सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता

सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता लक्षात घेता महापौर अजीव पाटील यांनी सदस्यांना घोषणाबाजी न करण्याची तंबी दिली. नियम मोडल्यास सभागृहाबाहेर काढण्याचा इशारा दिला. नामकरणासाठी प्रशासनाकडे एकूण १४ प्रस्ताव सादर झाले होते. त्यापैकी १३ प्रस्ताव विविध क्रीडा संघटनांकडून माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नावाचे, तर विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी भाजपच्या वतीने नरवीर चिमाजी आप्पा यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.

भाजपने चिमाजी आप्पांच्या नावाच्या बाजूने केले मतदान

अखेर भाजपने आपला विरोध कायम ठेवल्याने महापौरांनी दोन्ही प्रस्तावांवर हात उंचावून मतदान घेतले. या शक्तिप्रदर्शनात बविआच्या ६८ नगरसेवकांनी ठाकूर यांच्या नावाच्या बाजूने, तर भाजपच्या ३६ नगरसेवकांनी चिमाजी आप्पांच्या नावाच्या बाजूने मतदान केले. परिणामी, संख्याबळाच्या जोरावर लोकनेते हितेंद्र ठाकूर (अप्पा) हा नामकरणाचा ठराव बहुमताने मंजूर झाला.

रोजगारासाठी परजिल्ह्यात धाव! एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त

Ganga Godavari Temple: १२ वर्षांनीच भाविकांसाठी उघडते गंगा गोदावरी मातेचे मंदिर; जाणून घ्या ७०० वर्षांचा इतिहास

29 November Dinvishesh: आज माधव त्र्यंबक पटवर्धन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २९ नोव्हेंबरचा इतिहास..

काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू... शेवटचा व्हिडीओ व्हायरल अन् पुण्यातील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल!

गुलाबी पदार्थ पाहून मुलं होतील खुश! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीट पराठा, नोट करा रेसिपी