Prakash Abitkar visit Chhatrapati Sambhajinagar Women Hospital 
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४०० खाटांचे महिला रुग्णालय लवकरच सेवेत; सुपर स्पेशालिटी सुविधांवर भर देण्याचे आरोग्यमंत्री आबिटकरांचे निर्देश

Prakash Abitkar visit Chhatrapati Sambhajinagar Women Hospital: छत्रपती संभाजीनगर येथील ४०० खाटांच्या नवनिर्मित महिला रुग्णालयाची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी करून आधुनिक आरोग्य सुविधा आणि सुपर स्पेशालिटी सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले

Priyanka Mundinkeri
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये ४०० खाटांचे महिला रुग्णालय

  • प्रकाश आबिटकरांनी रुग्णालयाचा घेतला आढावा

  • कॅथलॅब आणि सुपर स्पेशालिटी सेवांबाबत मोठे निर्देश

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील नवनिर्मित ४०० खाटांच्या महिला रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा, बांधकामाची सद्यस्थिती तसेच भविष्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, सहाय्यक संचालक हिवताप डॉ. रेखा भंडारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.रुग्णालयात सर्व प्रकारच्या आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासह सुपर स्पेशालिटी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले. कोल्हापूर येथील रुग्णालयाच्या धर्तीवर या रुग्णालयाचेही स्वरूप सुपर स्पेशालिटी असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याव्यतिरिक्त आबिटकर यांनी कॅथलॅब (Cath Lab) यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचाही समावेश करण्याबाबतही सूचना केल्या.

४०० खाटांचे महिला रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण

रुग्णालयाच्या कामाचे स्वरूप, प्रशासकीय मान्यता, जागेची उपलब्धता, कंत्राटदाराकडून कामाचे हस्तांतरण तसेच आवश्यक मनुष्यबळ याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक पदांची भरती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) माध्यमातून करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त सुविधा व सेवांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी सादर करावी. महिलांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी उपचार उपलब्ध झाले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाबाबत मंत्री श्री. आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आलेले हे ४०० खाटांचे महिला रुग्णालय लवकरच लोकार्पणासाठी सज्ज होणार असून, या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना अत्याधुनिक, दर्जेदार आणि विशेषज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

रुग्णवाहिका सेवेची केली प्रत्यक्ष पाहणी

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती संभाजीनगर आरोग्य संवाद यात्रेदरम्यान १०८ रुग्णवाहिकेतून स्वतः प्रवास करून रुग्णवाहिका सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध होणाऱ्या सुविधा, रुग्णवाहिकेचा प्रतिसाद वेळ आणि वैद्यकीय सेवेची गुणवत्ता जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला.

US Storm : थँक्सगिव्हिंगच्या वादळाचा अमेरिकेला मोठा फटका; जवळपास १० लाख घरांचा वीजपुरवठा खंडित, हजारो विमानांची उड्डाणे विस्कळीत

'डावे-समाजवाद्यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज...'; प्रकाश आंबेडकरांचे खडेबोल

मोठी बातमी! 'हा' सर्वोत्तम क्रिकेटपटू लवकरच घेणार निवृत्ती? समोर आली तारीख

Bihar Viral Video : धावत्या बाईकवर उभा राहून स्टंट, मागे ट्रक! तरुणाचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांचे इंडिया आघाडीतील स्थान काय? राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले...