भाजपला सत्तेतून हटवण्याची भाषा करणाऱ्या डाव्या आणि समाजवादी पक्षांनी नवा राजकीय अजेंडा मांडावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले (फोटो - टीम नवराष्ट्र)  
पुणे

'डावे-समाजवाद्यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज...'; प्रकाश आंबेडकरांचे खडेबोल

भाजपला सत्तेतून हटवण्याची भाषा करणाऱ्या डाव्या आणि समाजवादी पक्षांनी नवा राजकीय अजेंडा मांडावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले. परिवर्तनासाठी ठोस भूमिका घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

प्रीति माने
  • फुले फेस्टिव्हलमधील ‘विचार संगती’ चर्चासत्रात प्रकाश आंबेडकर सहभागी

  • नवा राजकीय अजेंडा मांडण्याची व्यक्त केली गरज

  • भाजपच्या सत्तेवर व्यक्त केले मत

पुणे : आकाश ढुमेपाटील : भाजपची सत्ता हटवायची असे म्हणणाऱ्या डाव्या आणि समाजवादी पक्षांनी त्यासाठी नेमका पर्याय काय आहे, हे स्पष्ट केले पाहिजे. केवळ बैठका, चर्चा आणि ठराव करून परिवर्तन घडणार नाही. मूळ प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन नवा राजकीय अजेंडा मांडण्याची गरज आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी डावे आणि समाजवाद्यांना सुनावले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित फुले फेस्टिव्हलमधील ‘विचार संगती’ चर्चासत्रात आंबेडकर बोलत होते. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण यादव आणि राष्ट्र सेवा दलाचे राजा कांदळकर उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, ‘‘शोषित वर्गाचे डावे आणि समाजवादी हे सर्वांत जवळचे मित्र आहेत. मात्र, या मैत्रीला वैचारिक जोड देण्यात ते अपयशी ठरले. लोकशाहीच्या माध्यमातून झालेल्या परिवर्तनाला आपण आकार देऊ शकलो नाही. आपला मार्ग चुकीचा होता, हे डाव्या-समाजवाद्यांनी मान्य केले पाहिजे. तेव्हाच बदलाची अपेक्षा असणारे लोक आपल्यावर विश्वास ठेवतील.’’

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांचे इंडिया आघाडीतील स्थान काय? राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणला, तेव्हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद यावर चर्चा घडवून आणण्याची गरज होती. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा ठामपणे मांडला नाही. आता संघ सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या पुढे जाऊन ‘कॉर्पोरेट राष्ट्रवाद’ आणत असून संघराज्य व्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न होत आहे. या बदलांवरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांची अशीच अवस्था राहिली, तर संघर्ष सुरू राहील; मात्र संघर्ष करताना पराभवही स्वीकारावा लागेल आणि त्याची नोंद इतिहासात होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Rahul Gandhi Live : 'मत चोरीसाठी नवा प्लॅन...', राहुल गांधींचा डिलिमिटेशनवरून केंद्र सरकारवर निशाणा

२०१९ आणि २०२४ मध्ये मला बाहेर ठेवण्याचा परिणाम आज दिसत आहे. डावे आणि समाजवादी देशभर एकत्र आले, तर उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतही भाजपला सत्तेत येण्यापासून रोखता येईल. समाजघटकांना सोबत घेऊन लढण्याची इच्छा असेल, तर मी मदतीला तयार आहे,’’ अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

कामगार चळवळी बोनस-पगारवाढीपुरत्या

कामगार चळवळी केवळ बोनस आणि पगारवाढीपुरत्या मर्यादित राहिल्या. श्रमविभाजनाला सामाजिक आणि राजकीय आकार देण्यात या चळवळी अपयशी ठरल्या. कामगारांकडे केवळ मजुरीच्या दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक-राजकीय घटक म्हणून पाहिले, तर ते चळवळीशी जोडले जातील, असे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी डावे आणि समाजवादी पक्षांना काय सल्ला दिला?

भाजपला सत्तेतून हटवायचे असेल तर त्यासाठी ठोस पर्याय आणि नवा राजकीय अजेंडा मांडण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

भाजपला रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी कोणती भूमिका मांडली?

डावे आणि समाजवादी पक्ष देशभर एकत्र आले, तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांतही भाजपला सत्तेत येण्यापासून रोखता येईल, असे ते म्हणाले.

कामगार चळवळींबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काय मत व्यक्त केले?

कामगार चळवळी केवळ बोनस आणि पगारवाढीपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. कामगारांकडे सामाजिक आणि राजकीय घटक म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठी बातमी! 'हा' सर्वोत्तम क्रिकेटपटू लवकरच घेणार निवृत्ती? समोर आली तारीख

Bihar Viral Video : धावत्या बाईकवर उभा राहून स्टंट, मागे ट्रक! तरुणाचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांचे इंडिया आघाडीतील स्थान काय? राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले...

वाशिममध्ये हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा वापर; शासकीय नियम धाब्यावर, पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा

U19 Women's Asia Cup साठी टीम इंडियाची घोषणा! भाविका अहिरे करणार भारताचे नेतृत्व; पाहा संपूर्ण संघ