Eknath Shinde : गडकोटांचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी; शिवरायांकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, एकनाथ शिंदे यांचे आवाहन Eknath Shinde : गडकोटांचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी; शिवरायांकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, एकनाथ शिंदे यांचे आवाहन
रायगड

Eknath Shinde : गडकोटांचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी; शिवरायांकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, एकनाथ शिंदे यांचे आवाहन

संविधान दिनानिमित्त रायगडावर आयोजित ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकोटांचे पावित्र्य, ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण जपण्याचे आवाहन केले. शिवरायांच्या दूरदृष्टीतून तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि गडसंवर्धनाची मोहीम लोकचळवळ बनवावी, असे ते म्हणाले.

Rakesh Khedekar
  • 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान' अभियान रायगडावर संपन्न

  • उपमुख्यमंत्र्यांनी साधला स्वच्छता दूतांशी संवाद

  • पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट हे स्वराज्याच्या दूरदृष्टीचे, पराक्रमाचे आणि व्यवस्थापन कौशल्याचे प्रतीक आहेत. या गडांचे पावित्र्य, ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून शिवरायांच्या दूरदृष्टीतून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संविधान दिनानिमित्त रायगडावरील हिरकणीवाडी येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान' या विशेष अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संविधान, राजकीय आरोप-प्रत्यारोप, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विषयांवरही भूमिका मांडली.

शिंदे यांचा स्वच्छता दूतांशी संवाद

शिंदे यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. अभियानांतर्गत स्वच्छता दूतांशी संवाद साधतानाच पाचाड-महाड मार्गावरील वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली. शिवरायांनी किल्ल्यांवर पाणी व्यवस्थापन, धान्य साठवण, बाजारपेठा आणि संरक्षण व्यवस्थेचे नियोजन केले होते. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य जनतेचे हित केंद्रस्थानी होते. शिवरायांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे न्याय, समानता आणि लोकशाहीची मूल्ये पुढे नेणारे आहेत, असे त्यांनी सांगितले.

संविधानामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये संविधान दिनाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व दिले. मात्र, संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करून विरोधक जनतेमध्ये चुकीचे कथानक पसरवत असल्याचा आरोप करत शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील 218 गडांना भेट देणाऱ्या आठ वर्षीय मुलीच्या गडसंवर्धनविषयक सूचनांचे कौतुक करत त्यांनी गडांवरील प्लास्टिक कचरा, अतिक्रमणे आणि प्रदूषण रोखण्याची गरज अधोरेखित केली. गडकोटांचे संवर्धन, वृक्षारोपण, सौरऊर्जा, पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले.

ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा, नदी प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि अनुदानाच्या माध्यमातून मदतीचे प्रयत्न व्हावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संकटग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना सदैव उभी

शेतकरी, सामान्य नागरिक आणि संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी असून 'जिथे संकट, तिथे शिवसेना' या भूमिकेतून मदतीचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गडसंवर्धनाचे हे अभियान केवळ कार्यक्रम न राहता लोकचळवळ बनावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि स्वच्छता दूत तसेच शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, ४ जखमी

Terracotta Jewellery: टेराकोटा ज्वेलरीचा वाढतोय ट्रेंड, मातीच्या दागिन्यांनी महिलांना घातली भुरळ!

गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले

Avada Group Maharashtra: शेतात सौरऊर्जेचा प्रकाश, तरुणांसाठी रोजगाराची संधी! ‘कोण होणार करोडपती’मध्ये उलगडला आवाडाचा प्रवास

Wipro च्या कॅम्पसबाहेर उमेदवारांची प्रचंड रांग! हैदराबादच्या व्हायरल व्हिडिओने मांडले आयटी क्षेत्रातील वास्तव