Man Taluka Water Issue : राजेवाडी तलावातील पाणी उपसा सुरूच; मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ 
महाराष्ट्र

Man Taluka Water Issue : राजेवाडी तलावातील पाणी उपसा सुरूच; मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ

साताऱ्यातील माण तालुक्यात राजेवाडी तलावातून अहोरात्र पाणी उपसा सुरूच असल्याचा देवापूर ग्रामस्थांचा आरोप. पाणी उपसा बंद करण्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही कार्यवाही नसल्याने तलाव आटण्याची भीती व्यक्त होत आहे.

Rakesh Khedekar
  • पाणी उपसा बंद करण्यासाठी निवेदन

  • पक्षांना पिण्यासही पाणी शिल्लक राहणार नाही

  • मच्छीमार सोसायटीचा आंदोलनाचा इशारा

Man Taluka Water Issue : माण तालुक्यातील राजेवाडी तलावातून अद्यापही अहोरात्र पाणी उपसा सुरू असल्याने आगामी काही दिवसांतच हा तलाव कोरडा पडेल अशी भीती देवापुर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच या पाणी उपशाला वीज वितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे.

तसेच हा पाणी उपशा पाहता, येथील विज प्रवाह तात्काळ बंद करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी म्हसवड येथे झालेल्या आढावा बैठकीत वीज वितरणला दिले होते, मात्र त्यांच्या ढोंगळ कारभारामुळे हा पाणी उपसा सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना माण तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणुन ओळखला जाणाऱ्या राजेवाडी तलावातही सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यावरच आगामी 8 ते 9 महिने कसे बसे काढावे लागणार आहेत. या पाण्यावरच आगामी दिवसाचे नियोजन करावे लागणार असल्याने प्रशासनाने या तलावातील सर्व विद्युत मोटारी बंद करण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप येथील विद्युत वाहिन्या सुरू आहेत. त्यामुळे विद्युत मोटारीच्या साह्याने अहोरात्र पाणी उपसा सुरू आहे.

हा पाणी उपसा असाच सुरू राहिला, तर आगामी काही दिवसांतच हा तलाव पाण्याविना कोरडा ठाक पडण्याची भिती देवापुर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पाणी उपसा बंद करण्यासाठी निवेदन

दरम्यान, हा पाणी उपसा तात्काळ बंद करावा यासाठी देवापुर येथील मच्छीमार सोसायटीच्या वतीने तहसिलदार, पाटबंधारे विभाग, विज वितरण कंपनी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाला 10 दिवस उलटूनही हा पाणी उपसा विज कंपणीच्या आशीर्वादाने सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पक्षांना पिण्यासही पाणी शिल्लक राहणार नाही

सदर तलावातून अहोरात्र पाणी उपसा सुरू राहिल्यास काही दिवसांतच सदरचा तलाव हा कोरडा पडण्याची शक्यता असून हा तलाव कोरडा पडल्यास देवापुर, पळसावडे, हिंगणी यासह आटपाडी तालुक्यातीलही अनेक गावांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होणार नाही, तर पक्षांनाही पिण्यास पाणी शिल्लक राहणार नसल्याची भिती या परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

मच्छीमार सोसायटीचा आंदोलनाचा इशारा

सदर तलावात देवापुर येथील मच्छीमारी सोसायटीने लाखो रुपयांचे मत्सबीज सोडले असून या सोसायटीचे अनेक सदस्य याच तलावात मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे पाणी उपसा असाच सुरू राहिल्यास येथील तलाव कोरडा पडून त्यांच्या कुटुंबाचा उपासमार सुरू होइल, अशी भीतीही या सोसायटीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

Breaking News : जगभरात उपासमारीचे संकट गडद होणार; संयुक्त राष्ट्रांचा इशारा, आफ्रिकेतील काही भागात तीव्र दुष्काळाचा धोका

Weight Loss Tips: वेट लॉस करायचंय, पण डाएट कसं असावं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खा 'हे' पदार्थ, वाचा Diet प्लॅन

बाईकचा स्पीडोमीटर 60, GPS वर 55! वेगात हा फरक का दिसतो?

Traffic Police Viral Video: ‘प्रत्येक गणवेशामागे एक माणूस’ झाडाखाली बसून जेवण करणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

‘नेते जनतेत दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंगवर नाही’; पुण्याच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक