Winter Fog Highway Accident Prevention Winter Fog Highway Accident Prevention
महाराष्ट्र

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

Washim Winter Fog Highway Accident Prevention: हिवाळ्यात धुक्यामुळे महामार्गावरील अपघातांचा धोका वाढत असल्याने वाशिम जिल्हा पोलिसांनी विशेष उपाययोजना आखल्या आहेत.

Priyanka Mundinkeri
  • धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट!

  • महामार्गावर क्रेन, रुग्णवाहिकाही सज्ज

  • पोलिसांकडून वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

वाशिम: हिवाळ्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात रात्री तसेच पहाटेच्या सुमारास महामार्गावर धुक्याचे प्रमाण वाढत वाढते. दरम्यान, दृश्यमानता कमी होऊन वाहनांचा अपघातांचा धोका जास्त प्रमाणात निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिसांकडून विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाणे आणि यंत्रणांना आवश्यक अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

हिवाळ्यात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सूचना

हिवाळ्यात धुक्यामुळे महामार्गावरील वाहनचालकांना रस्ता, समोरील वाहने तसेच दिशादर्शक फलक स्पष्ट दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून त्या भागात विशेष गस्त वाढविण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे, धुक्यात फॉग लॅम्प व लो बीम हेडलाईटचा योग्य वापर करण्याबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

महामार्गावर क्रेन, टोईंग व्हॅन व रुग्णवाहिका सज्ज

महामार्गावरील सेंटर लाइन, लेन मार्किंग, कॅट्स आय, रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक सुस्थितीत राहावेत, यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे. याशिवाय एमएसआरडीसी, एनएचएआय आणि टोल प्रशासनाच्या सहकार्याने महामार्गावर क्रेन, टोईंग व्हॅन व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. अपघात घडल्यास तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार आहे.

वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन

धुक्यात वाहन चालविताना वेग कमी ठेवावा, समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे, ओव्हरटेक करणे टाळावे आणि वाहनांचे दिवे योग्य प्रकारे वापरावेत. धुक्याच्या परिस्थितीत घाई न करता सावधपणे वाहन चालवून स्वतः सह इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले.

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Bopdeo Ghat Accident प्रकरणात मोठी बातमी; चालकाला कोर्टाने थेट...; वाचा सविस्तर

Kho Kho Championship : चार गुणांनी हुकले सुवर्ण! कर्नाटककडून महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव

Winter Health: थंडीत सकाळी अंथरुणातून उठण्याची इच्छा होत नाही? Winter Blues ची 'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका

Rohit Pawar : आधी सुनेत्रा पवारांची माफी मागितली, मग अजितदादांबाबत मोठं विधान! रोहित पवार म्हणाले, 'त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही'