Washim Dam Water Shortage 
महाराष्ट्र

Washim: पाणीटंचाईचे संकट गडद! एकबुर्जी प्रकल्पात ३२ टक्केच जलसाठा; पाणी काटकसरीने वापरण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

Washim Ekburji Dam Water Level Shortage: वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ ३२ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने नगराध्यक्ष अनिल केंदळे आणि मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करून अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.

Priyanka Mundinkeri
  • वाशिम शहरावर पाणीटंचाईचे सावट

  • एकबुर्जी धरणातील जलसाठा घटला

  • अनिल केंदळेंचे वाशिमकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

वाशिम: कमी पावसामुळे शहराला वाशिम पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ३२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आगामी उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध जलसाठ्याचे जतन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी वाशिमकरांना केले आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे महत्त्व नागरिकांना जाणवू लागले आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने एकबुर्जी प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून तो उन्हाळ्यापर्यंत पुरविण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अनिल केंदळे व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले.

शहरात काही ठिकाणी नळ सुरू ठेवून वाहने धुणे, अंगण स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर करणे, पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही मोटार सुरू ठेवणे तसेच नळगळतीकडे दुर्लक्ष करणे, अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

पाणी बचतीची सवय अंगीकारा

शहरातील ज्या नागरिकांच्या नळ कनेक्शनला तोट्या बसविण्यात आलेल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारण्यात येणार असल्याचा इशाराही नगरपालिकेने दिला आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणी बचतीची सवय अंगीकारावी, असे आवाहन नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासनाने केले.

पाणीटंचाई टाळण्यासाठी केवळ प्रशासनाचे नियोजन पुरेसे नसून नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. घरगुती वापरात पाणी जपून वापरणे, नळांची गळती त्वरित दुरुस्त करणे आणि पाण्याच्या टाक्या विनाकारण ओसंडू न देणे आवश्यक आहे.

MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय

Bumrah भाऊने स्टाईलच बदलली? न्यूझीलंडविरुद्धचा Jasprit च्या रनअपचा Video Viral

बाईकच्या इंजिनमध्ये Short Stroke की Long Stroke? कोणते इंजिन जास्त दमदार?

लॅम्बोर्गिनी Temerario Spyder साठी ब्रिजस्टोनचे खास टायर्स; 20 आणि 21 इंचांच्या 3 प्रकारच्या टायर्सची सुविधा

Pune Crime: पुण्यात खळबळ! बँकेबाहेर बेवारस बॅग अन् पोलिसांची धावपळ, बॉम्बशोधक पथकाची तपासणी