मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार
राजकारण

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये? मनोज जरांगे थेट तुमच्या जिल्ह्यात येणार! लवकरच महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा

Manoj Jarange Patil Maharashtra Tour : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आता महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. लवकरच या दौऱ्याला सुरुवात होणार असून, या दौऱ्यात ते जिल्हानिहाय मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत.

Vivek
  • मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा

  • कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय भेटी

  • 1 डिसेंबरला दौऱ्याचं सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार

जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. लवकरच या दौऱ्याला सुरुवात होणार असून, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन ते मराठा बांधवांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. विशेष म्हणजे, कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधतेच्या प्रश्नांवर या दौऱ्यात भर दिला जाणार आहे. (Manoj Jarange Patil Maharashtra Tour)

मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आणि उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्र मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुणबी नोंदी उपलब्ध असूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याशिवाय जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींचाही प्रश्न कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचं ठरवलं आहे. या दौऱ्यात ते प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांशी थेट संवाद साधणार आहेत.

कधी होणार जरांगेंचा महाराष्ट्र दौरा?

मनोज जरांगे यांचा हा महाराष्ट्र दौरा चार ते पाच टप्प्यांत पार पडणार आहे. 7 डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन ते मराठा बांधवांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक दिवस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम 1 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे.

या दौऱ्यात ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेलं नाही, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळालं आहे की नाही, याचीही माहिती घेतली जाणार आहे.

मराठा बांधवांना जरांगेंचं आवाहन

कुणबी प्रमाणपत्र मिळवताना कोणत्या अडचणी येत आहेत, याबाबत मराठा बांधवांनी दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेटून आपली बाजू मांडावी, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान आंतरवाली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याची भूमिकाही घेतली होती. मात्र, सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं.

आता या महाराष्ट्र दौऱ्यातून मराठा समाजाच्या प्रमाणपत्रविषयक अडचणी समोर येणार आहेत. त्यामुळे 1 डिसेंबरला जाहीर होणाऱ्या दौऱ्याच्या कार्यक्रमाकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.

Japanese Couple Viral Video : घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा प्रेम जुळले! जपानी जोडप्याने लखनौमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न

Tarali Project Controversy: तारळी प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सयाजी शिंदेंनी उघडला कायदेशीर लढ्याचा मोर्चा!

FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PM Modi Balen Shah Meet: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना पीएम मोदींची मोठी भेट! IIT कॅपसबाबत घेतला 'हा' मोठा ऐतिहासिक निर्णय