सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; 'नीट' वादावरून वातावरण तापले 
राजकारण

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, संयुक्त पत्रपरिषदेत सरकारने त्यांना दोन प्रमुख आश्वासने दिली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर तातडीने मागे घेतले किया रद्द केले जातील

anuradha sagar
  • आश्वासनांची पूर्तता न झाल्यास काँक्रोच जनता पार्टीकडून पुन्हा देशव्यापी आंदोलनाची घोषणा.
  • कराराच्या आधारे आंदोलन मागे घेतले होते, मात्र सरकार अंमलबजावणीत टाळाटाळ करत असल्याचा आरोप.
  • सर्वोच्च न्यायालयाने एफआयआरची यादी मागूनही केंद्र सरकारकडून माहिती देण्यास विलंब.

Cockroach Janta Party: सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, तर देशात पुन्हा एकदा शांततापूर्ण आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा काँक्रोच जनता पार्टीने दिला आहे. सीजेपीने केंद्र सरकारवर तरुणांना दिलेल्या आश्वासनांपासून माधार घेतल्याचा आणि त्यांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, २५ जुलै रोजी झालेल्या कराराच्या आधारावर देशव्यापी आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता सरकार त्या कराराची अंमलबजावणी करण्यापासून मागे हटत आहे.

सीजेपीच्या कायदेशीर पथकातील सदस्य आणि नेत्यांच्या म्हणण्यानुसार, १८ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारकडे विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची संपूर्ण यादी तीन वेळा मागितली होती. सुप्रीम कोर्टाला सर्व प्रकरणे एकाच वेळी रद्द करण्याची इच्छा होती, ज्यामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली असती. मात्र, न्यायालयाने वारंवार विचारणा करूनही केंद्र सरकारने ही यादी सादर करण्याबाबत कोणतीही स्पष्ट चांधिलकी व्यक्त केली नसल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.

तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पत्रपरिषदेत सीजेपीचे सहसंयोजक सौरव दास आणि कायदेविषयक प्रकरणांचे प्रमुख रत्ना सिंह यांनी आरोप केला की, आआंदोलन संपवून घेतल्यानंतर सरकार देशातील तरुणांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या वाटाघाटी टीमने आपल्या आश्वासनांवर आतापर्यंत झालेल्या प्रगतीबाबत कोणतेही औपचारिक लेखी आश्वासन दिलेले नाही.

सरकारची दोन प्रमुख आश्वासने

सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, संयुक्त पत्रपरिषदेत सरकारने त्यांना दोन प्रमुख आश्वासने दिली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर तातडीने मागे घेतले किया रद्द केले जातील, तसेच भविष्यात कोणावरही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, तसेच नीट परीक्षेशी संबंधित वादात जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक भरपाई दिली जाईल.

आज राष्ट्रीय - कार्यकारिणीची बैठक

काँक्रोच पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज, २४ ऑगस्ट रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे. सीजेपीने देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि आपल्या कार्यकर्त्यांना या बैठकीत होणाऱ्या निर्णयांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

पदवी नाही, वैद्यकीय नोंदणीही नाही; तरीही रुग्णांवर उपचार सुरू! बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

Coconut Oil Flooring: नारळाच्या तेलापासून तयार होतंय घराचं फ्लोरिंग! दक्षिण भारतातील अनोखी पद्धत पाहून व्हाल थक्क

परदेश प्रवासात इंटरनेटचा वापर होणार अधिक सुलभ! WhatsApp लवकरच घेऊन येणार नवीन ट्रॅव्हल ई-सिम फीचर, असं करणार काम

Supriya Sule Apologies: मी हात जोडून माफी मागते; रोहित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

Crochet: तुम्हीही क्रोशे विणकाम करताय का? जाणून घ्या धाग्यांचे प्रकार आणि विणकाम करताना कोणत्या चुका टाळाव्यात!