दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? शशिकांत शिंदेंचा मोठा दावा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? शशिकांत शिंदेंचा मोठा दावा
राजकारण

NCP Merger : राष्ट्रवादीचे आठही खासदार पक्ष सोडणार? शशिकांत शिंदेंनी चर्चेचं सत्य सांगितलं

Shashikant Shinde on NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू असतानाच शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. विलिनीकरणाचा विषय सध्या थांबलेला असून कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Vivek
  • प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

  • सुनेत्रा पवारांच्या आमदारांच्या बैठकीमुळे राजकीय तर्कवितर्क

  • विलीनीकरणाचा विषय सध्या थांबलेला असल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण

Shashikant Shinde on NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचे गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत वेगवेगळे दावे आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी या चर्चांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. विलिनीकरणाचा विषय सध्या थांबलेला असून कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय सध्या थांबलेला आहे. यासंदर्भात कोणतीही चर्चा सुरू नाही, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर या विषयावर पुन्हा चर्चा करणं योग्य नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागल्याचं चित्र आहे.

प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता.

त्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातही चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात होते.

आठही खासदार पक्षासोबतच, शिंदेंचा दावा

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनाही शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

पक्षाचे सर्व आठही खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकत्रितपणे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. निलेश लंके, अमोल कोल्हे यांच्यासह बीड आणि नाशिकच्या खासदारांशी संपर्क असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या केवळ वावड्या असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यामुळे सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसल्याचं शशिकांत शिंदे यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. भविष्यात या राजकीय समीकरणांमध्ये काही बदल होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Japanese Couple Viral Video : घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा प्रेम जुळले! जपानी जोडप्याने लखनौमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न

Tarali Project Controversy: तारळी प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सयाजी शिंदेंनी उघडला कायदेशीर लढ्याचा मोर्चा!

FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PM Modi Balen Shah Meet: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना पीएम मोदींची मोठी भेट! IIT कॅपसबाबत घेतला 'हा' मोठा ऐतिहासिक निर्णय