Fit India Sunday on Cycle : पुण्यात 'संडे ऑन सायकल'चा शतकमहोत्सव; 50 हजार सायकलप्रेमी सहभागी होणार फोटो सौजन्य : आयएएनएस
Sports

Fit India Sunday on Cycle : पुण्यात 'संडे ऑन सायकल'चा शतकमहोत्सव; 50 हजार सायकलप्रेमी सहभागी होणार

फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 100 व्या आवृत्तीचे 29 नोव्हेंबरला पुण्यात आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया नेतृत्व करणार असून, जवळपास 50 हजार सायकलप्रेमी आणि देशभरातील 100 ऑलिम्पियन या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

Rakesh Khedekar
  • केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया करणार नेतृत्व

  • देशातील 100 ठिकाणी 100 ऑलिम्पियन सहभागी होणार

  • 'ऑलिम्पिकसाठी भारत सज्ज' ही यंदाची संकल्पना

Fit India Sunday on Cycle : देशभरात फिटनेसचा संदेश देणाऱ्या 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' या उपक्रमाचा 100 वा टप्पा येत्या 29 नोव्हेंबरला पुण्यात पार पडणार आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया या उपक्रमाचे नेतृत्व करणार असून, या विशेष आयोजनात जवळपास 50 हजार सायकलप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पिंपरी-चिंचवड येथे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन करण्यात येणार आहे.

यंदाच्या शतकमहोत्सवी उपक्रमाची संकल्पना 'इंडिया रेडी फॉर ऑलिम्पिक्स' अशी आहे. ऑलिम्पिक चळवळ आणि देशातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यावर या माध्यमातून भर दिला जाणार आहे. देशभरातील 100 प्रमुख ठिकाणी 100 भारतीय ऑलिम्पियन सहभागी होणार आहेत. तसेच 'माय भारत'च्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यातील तरुणांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

आतापर्यंत लाखो नागरिकांचा सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोगी आणि तंदुरुस्त राष्ट्राचे आवाहन केल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' उपक्रमाला सुरुवात झाली. नवी दिल्लीतील 250 ठिकाणी सुमारे 500 सहभागींच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार आता देशव्यापी जनचळवळीत झाला आहे.

संविधान दिनाच्या संकल्पनेवर आधारित 99 व्या आवृत्तीत देशभरातील 26 हजारांहून अधिक ठिकाणी लाखो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामुळे या उपक्रमाची लोकप्रियता आणि व्याप्ती स्पष्ट झाली आहे.

खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती

100 व्या आवृत्तीत ऑलिम्पिक चळवळीतील सुशासन, प्रामाणिकपणा, निष्पक्ष स्पर्धा, सर्वसमावेशकता, खेळाडूंचे कल्याण आणि शाश्वतता या मूल्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. खेळातील नैतिकता, समान संधी आणि खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

महिला खेळाडू आणि पॅरा-अॅथलीट्सच्या सहभागालाही यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. खेळाडूंचे मत आणि सर्वसमावेशकतेला महत्त्व देणारी क्रीडा व्यवस्था निर्माण करण्याचा भारताचा संकल्प या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. तरुणांनी खेळ आणि शारीरिक व्यायामाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

'फिटनेस का डोस, आधा घंटा रोज' या पंतप्रधानांच्या संदेशातून प्रेरणा घेत नागरिकांनी दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचालींसाठी द्यावीत, असे आवाहन या मोहिमेतून केले जात आहे.

या प्रवासात 'संडे ऑन सायकल' उपक्रमाने विविध राष्ट्रीय मोहिमा आणि सामाजिक संदेशांसाठीही प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. लठ्ठपणा कमी करणे, नशामुक्त भारत आणि प्रदूषणावर उपाय अशा विषयांवर विशेष मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्ये निरोगी सवयी रुजवून 'फिट इंडिया' आणि 'विकसित भारत' या संकल्पनांना हातभार लावणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

Delimitation Bill Approved : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला हिरवा कंदील; राज्यांतील जागांमध्ये ५०% वाढ

पुण्यनगरीत रंगणार Table Tennis चा थरार! 'या' देशांचे खेळाडू होणार सहभागी, विजेत्याला...

Buldhana: मंजुरी मिळाली, पण खात्यात पैसेच नाहीत; बुलढाण्यात ५,१३७ शेतकरी मदतीपासून वंचित, अग्रिम अनुदानाच्या वाटपात तांत्रिक अडथळे

Coffee: तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? जाणून घ्या कॉफीचे ८ लोकप्रिय प्रकार आणि त्यांची खासियत!

भारतात घुसखोरी करून बनवले बनावट आधार कार्ड; बांगलादेशी तरुणाला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा