जसप्रीत बुमराह  (फोटो- ट्विटर)
Sports

Bumrah भाऊने स्टाईलच बदलली? न्यूझीलंडविरुद्धचा Jasprit च्या रनअपचा Video Viral

Jasprit Bumrah: जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी असलेल्या जासपररत बुमराहने आपल्या गोलंदाजीची स्टाईल बदलली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तेजस भागवत
  • भारत-न्यूझीलंडमध्ये सुरू आहे दुसरा कसोटी samnaa

  • जसप्रीत बुमराहने स्टाईल बदलली असल्याची चर्चा

  • समोर आला बुमराहचा अनोखा व्हिडिओ व्हायरल

IND Vs NZ: आजपासून भारत अन् न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पहिला सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे हा दुसरा सामना भारतीय संघांसाठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे जसप्रीत बुमराह.

जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी असलेल्या जासपररत बुमराहने आपल्या गोलंदाजीची स्टाईल बदलली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे याबाबत आता अधिक माहिती जाणून घेऊयात.

Mohammad Siraj : विश्वास ठेवणं कठिण, तरी त्याला पुन्हा बाहेर केलं; सिराजला जागा न मिळल्यानं माजी भारतीय क्रिकेटर्स नाराज

सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहची मैदानातील कामगिरी नेहमीच चर्चेत असते. क्रिकेटच्या तीनही फॉर्मटमध्ये त्याने आपल्या कामगिरीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. बहुतांश वेगवान गोलंदाजांच्या रनअप आणि गोलंदाजीच्या हालचालींमध्ये बुमराहची स्टाईल वेगळी दिसून येते.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपली स्टाईल बदलली असल्याचे दिसून आले. त्याचा रनअप नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा दिसून आला. मात्र हा बदल केवळ रनअपबाबतच असल्याचे दिसून आले. त्याच्या अ‍ॅक्शनमध्ये कोणताही बदल झालेला दिसून आला नाही.

दुसऱ्या कसोटीत काही बॉल बुमराहने नेहमीपेक्षा वेगळ्या रनअपमध्ये टाकल्याचे पाहायला मिळाले. यचीय सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बुमराहचा हा रनअप पाहून त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याची आठवण होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तो अशाच प्रकारचा रनअप घेत असे. वेगवान गोलंदाजांकडून लय आणि दिशा कायम ठेवण्यासाठी असे अनेक बदल केले जातात. त्यामुळे बुमराहची ही स्टाईल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

IND vs NZ: एका खेळीत विक्रमांची रांगच पार! केन विल्यमसनला पछाडलं, कोहलीलाही टाकलं मागे; Tom Lathamची WTC मध्ये ऐतिहासिक कामगिरी

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये टॉम लॅथमला एलबीडब्ल्यूमध्ये पकडले होते. अंपायरने त्याला आउट देखील दिले. मात्र डीआरएसमध्ये तो नॉट आउट ठरला. आजच्या दिवशी बुमराहने अत्यंत प्रभावी गोलंदाजी केल्याचे दिसून आले. मात्र त्याला विकेट घेण्यात अपयश आले. त्याने 19 ओव्हरमध्ये 37 रन्स दिल्या.

जेवणानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. प्रथम, त्यांनी धावगती रोखली आणि नंतर ११० धावांत तीन बळी घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. लॅथम (५९) यष्टीमागे झेलबाद झाला, हेन्री निकोल्स (१६) लाँग लेगला झेलबाद झाला आणि रचिन रवींद्रही यष्टीमागे झेलबाद झाला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्याचा निकाल काय आला?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित म्हणजेच ड्रॉ झाला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात चर्चेचा विषय कोण ठरला?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चर्चेचा विषय ठरला.

MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय

Washim: पाणीटंचाईचे संकट गडद! एकबुर्जी प्रकल्पात ३२ टक्केच जलसाठा; पाणी काटकसरीने वापरण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

बाईकच्या इंजिनमध्ये Short Stroke की Long Stroke? कोणते इंजिन जास्त दमदार?

लॅम्बोर्गिनी Temerario Spyder साठी ब्रिजस्टोनचे खास टायर्स; 20 आणि 21 इंचांच्या 3 प्रकारच्या टायर्सची सुविधा

Pune Crime: पुण्यात खळबळ! बँकेबाहेर बेवारस बॅग अन् पोलिसांची धावपळ, बॉम्बशोधक पथकाची तपासणी