Mohammed Shami : मोहम्मद शमीनं घेतली भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण! क्रीडा विकासावर झाली चर्चा फोटो सौजन्य : आयएएनएस
Sports

Mohammed Shami : मोहम्मद शमीनं घेतली भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण! क्रीडा विकासावर झाली चर्चा

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत क्रीडा क्षेत्राचा विकास, युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि अल्पसंख्याक समाजातील तरुणांचा खेळांमधील सहभाग वाढविण्यावर चर्चा झाली.

Rakesh Khedekar
  • मोहम्मद शमींची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी सदिच्छा भेट

  • क्रीडा विकास, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर चर्चा

  • अल्पसंख्याक समाजातील तरुणांचा खेळांमधील सहभाग वाढविण्यावर भर

Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने रविवारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान देशातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि अल्पसंख्याक समाजातील तरुणांचा खेळांमधील सहभाग वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली.

या भेटीत क्रीडा क्षेत्रातील नव्या प्रतिभांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे, तरुणांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. खेळांच्या माध्यमातून तरुणांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

नोव्हेंबरमध्ये कसोटीतून निवृत्ती

दरम्यान, कसोटी संघात दीर्घकाळ संधी न मिळाल्यानंतर मोहम्मद शमीने 6 नोव्हेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने जून 2023 मध्ये भारताकडून अखेरचा कसोटी सामना खेळला होता. मार्च 2025 मध्ये तो अखेरचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसला होता.

शमीने नोव्हेंबर 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीत त्याने 64 कसोटी सामने खेळताना 27.71 च्या सरासरीने 229 बळी घेतले. फलंदाजीतही त्याने 750 धावा केल्या असून, त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 108 सामन्यांत त्याने 206 बळी, तर 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 27 बळी मिळवले आहेत.

यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार

आयपीएलमध्येही शमीच्या संघात बदल झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळल्यानंतर आता तो राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. लखनौने त्याला 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, आता सुधारित आठ कोटी रुपयांच्या किमतीत तो राजस्थान संघाशी जोडला जाणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 132 सामने खेळताना त्याने 145 बळी घेतले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या नव्या कार्यकारिणीत त्याची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Green Tea Side Effects: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिता? मग 'हे' दुष्परिणामही जाणून घ्या!

Myanmar Balloon Festival Accident : आकाशातच फटाक्यांनी भरलेला बलून फुटला! १६ जण भाजले, १२० जण जखमी

पाण्याची टाकी दाखवण्याच्या बहाण्याने मुलींना गच्चीवर नेऊन छळ; आरोपीला न्यायालयाचा मोठा दणका

माझ्या वाटणीची जमीन मला दे म्हणणे भोवले! १४ वर्षे शिक्षा भोगून सहा महिन्यांपूर्वीच सुटका झाली; मात्र सख्ख्या भावानेच...

IND vs NZ: हॅगली ओव्हलचा रेकॉर्ड टीम इंडियासाठी डोकेदुखी! किवींना रोखलं नाही तर भारत अडचणीत; चौथ्या डावात चमत्कार घडणार?