मॅजीशियन्स्‌, लिजेंडस्‌, किंग्ज्‌ संघांची आगेकूच (फोटो- सोशल मिडिया) 
Sports

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

Snooker: दुसऱ्या एका लढतीत पुना क्लब किंग्ज्‌‍ संघाने जयराज ब्लास्टर्स संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात राजीव खांडके, पंकज परमार, प्रशांत राजघरीया, कुणाल वासवानी, गिरीष दामले आणि विशाल अरोरा यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाचे योगदान दिले.

तेजस भागवत
  • क्यु स्पोर्ट्‌स आंतरक्लब लीग मॅजीशियन्स्‌, लिजेंडस्‌, किंग्ज्‌ संघांची आगेकूच
  • पुना क्लब मॅजीशियन्स्‌ व किंग्ज्‌ संघांचा ५-० असा एकतर्फी विजय
  • डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने स्पर्धेच आयोजन 

पुणे/Cricket: डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित 'व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌' क्यु स्पोर्ट्‌‍स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍, आरसीबीसी लिजेंडस्‌‍ आणि पुना क्लब किंग्ज्‌‍ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी आगेकूच केली. डेक्कन जिमखाना क्लब, आरसीबीसी क्लब, पुना क्लब आणि जयराज क्लबच्या बिलियर्डस्‌‍ व स्नुकर हॉलमध्ये या स्पर्धेतील लढती पार पडल्या.

पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍ संघाने आरसीबीसी ऑल स्टार्स संघाचा ५-० अशा एकाच फरकाने सलग दोन सामन्यांत पराभव करत शानदार दुहेरी विजय मिळवला. या विजयात विग्नेश संघवी, दिनेश मेहतानी, कपिल पंजाबी, अनिल काकडे, अनिश केअरींग, अंगद सहानी आणि सुरज राठी या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

आरसीबीसी लिजेंडस्‌ची चुरशीच्या लढतीत बाजी

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत आरसीबीसी लिजेंडस्‌‍ संघाने डेक्कन जिमखाना ऐसेस संघावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. पहिल्या लढतीत आरसीबीसीच्या झुबिन रजिस्ट्रारने सिध्दार्थ टेंबेचा १०७-७८ असा पराभव करत संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात डेक्कनच्या प्रशांत नातूने मजहर ताहेरबॉयला ४३-२९ असे पराभूत करून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. आरसीबीसीच्या विजय नचानीने डेक्कनच्या मिहीर गोखलेचा १५१-१०९ असा पराभव करत आघाडी मिळवून दिली.

 ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला

डेक्कनच्या अर्चिन पळनीटकरने आरसीबीसीच्या रिशी रामय्याचा ४६-३५ असा पराभव करून सामन्यात पुन्हा २-२ अशी बरोबरी आणली. शेवटच्या निर्णायक लढतीत अंतिम दुहेरी लढतीत आरसीबीसीच्या वेदांत दोशी व पंकज सहानी जोडीने डेक्कनच्या समर खंडेलवाल व उदय पुंडे जोडीचा ५९-४८ असा पराभव करून संघाला ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून दिला.

पुना क्लब किंग्ज्‌चा एकतर्फी विजय

दुसऱ्या एका लढतीत पुना क्लब किंग्ज्‌‍ संघाने जयराज ब्लास्टर्स संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात राजीव खांडके, पंकज परमार, प्रशांत राजघरीया, कुणाल वासवानी, गिरीष दामले आणि विशाल अरोरा यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाचे योगदान दिले.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका