Kabaddi Tournament : कुमार गट कबड्डीचा थरार! आठ संघांची बाद फेरीत धडक; उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित Kabaddi Tournament : कुमार गट कबड्डीचा थरार! आठ संघांची बाद फेरीत धडक; उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित
Sports

Kabaddi Tournament : कुमार गट कबड्डीचा थरार! आठ संघांची बाद फेरीत धडक; उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित

यंग भारत सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवनेरी सेवा, स्वस्तिक मंडळ, गुडमॉर्निंग, बास्को स्पोर्टस्, श्री स्वामी समर्थ आणि अमर क्रीडा यांनी बाद फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघांचे सामने निश्चित झाले असून, प्रभादेवी येथे कबड्डीचा थरार रंगणार आहे.

Rakesh Khedekar
  • आधी बास्को स्पोर्ट्सचा विजय क्लबला दणका

  • दुसऱ्या सामन्यात बॉस्कोला गुडमॉर्निंगने नमवले

  • स्वस्तिक मंडळाचा दणदणीत विजय

Kabaddi Tournament : यंग भारत सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवनेरी सेवा, स्वस्तिक मंडळ, गुडमॉर्निंग आणि बास्को स्पोर्ट्स यांनी दमदार कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केला. श्री स्वामी समर्थ आणि अमर क्रीडा यांनी गुणांच्या फरकावर बाद फेरीतील स्थान निश्चित केले. श्रीराम क्रीडा विश्वस्त आणि यश क्रीडा यांनी यापूर्वीच बाद फेरी गाठली होती. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रभादेवी येथील स्व. राजाभाऊ साळवी क्रीडानगरीतील स्व. भिकाजी गुणाजी भारती क्रीडांगणावर सामने रंगले. उपांत्यपूर्व फेरीत श्री स्वामी समर्थ विरुद्ध बास्को स्पोर्ट्स, स्वस्तिक मंडळ विरुद्ध श्रीराम क्रीडा विश्वस्त, शिवनेरी सेवा विरुद्ध यश क्रीडा आणि अमर क्रीडा विरुद्ध गुडमॉर्निंग असे सामने होतील.

आधी बास्को स्पोर्ट्सचा विजय क्लबला दणका

ड गटातील सामन्यात ठाण्याच्या बास्को स्पोर्ट्स संघाने मुंबई शहरच्या बलाढ्य विजय क्लबला 36-35 असे एका गुणाने पराभूत केले. मध्यंतराला दोन्ही संघ 18-18 असे बरोबरीत होते. अखेरच्या क्षणी बास्कोने बाजी मारत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. विजय क्लबला शेवटच्या क्षणी अव्वल पकडीच्या जोरावर विजय मिळवण्याची संधी होती; मात्र त्यांना ती साधता आली नाही. बास्कोकडून प्रणव सारमाठ आणि श्रवण तांबे यांनी, तर विजय क्लबकडून श्रेयस रविंद्र आणि बिजेंद्र यादव यांनी उत्कृष्ट खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात बॉस्कोला गुडमॉर्निंगने नमवले

मात्र, दुसऱ्या सामन्यात बास्कोला गुडमॉर्निंग संघाने 34-20 असे नमविले. मध्यंतराला गुडमॉर्निंगकडे 20-13 अशी आघाडी होती. उत्तरार्धात त्यांनी ही आघाडी कायम राखत विजय मिळवला. सुनील दळवी आणि श्रवण पाटील हे विजयाचे शिल्पकार ठरले. बास्कोच्या प्रणव सारमाठची झुंज मात्र एकाकी ठरली.

स्वस्तिक मंडळाचा दणदणीत विजय

ब गटात शिवनेरी सेवा संघाने उपनगरच्या स्वस्तिक मंडळाचा 51-34 असा पराभव केला. मध्यंतराला शिवनेरीकडे 33-15 अशी मोठी आघाडी होती. उत्तरार्धात सावध खेळ करत त्यांनी गटात अव्वल स्थान मिळवले. यश चोरगे आणि हर्ष कदम यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वस्तिककडून चैतन्य चव्हाण आणि आर्यन मोरे यांनी चांगला खेळ केला.

अ गटात अमर मंडळाने श्री स्वामी समर्थ संघाचा 32-29 असा पराभव केला. त्यामुळे या गटातील तिन्ही संघांचे साखळी गुण समान झाले. त्यानंतर गुणांच्या फरकावर गटातील क्रमवारी निश्चित करण्यात आली. श्री स्वामी समर्थने अधिक 7 गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवले. अमर मंडळ शून्य गुणांच्या फरकासह दुसऱ्या, तर हिंद इंडियाचा वजा 6 गुणांसह तिसरा क्रमांक लागला.

पुणेकरांची सार्वजनिक वाहतूकीकडे पाठ; मेट्रो अन् बस असूनही खाजगी वाहनांचा वापर जास्त

Baramati News: वाढत्या गुन्हेगारीने बारामतीची चिंता वाढवली; युगेंद्र पवारांची थेट डीवायएसपींशी चर्चा, कठोर भूमिका घेण्याची मागणी

Buldhana: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ६ महिन्यांचे वेतन देणार! केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांची मोठी घोषणा

Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या मागे फायनान्स कंपन्यांनी लागू नये; एकनाथ शिंदेंचा थेट जेलमध्ये टाकण्याचा इशारा

संसदेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन; पण कारण काय? किरेन रिजिजू यांची घोषणा