भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने त्यांच्या यूजर्ससाठी एक तगडा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना मंथली 5000GB डेटासह अनेक ओटीटी अॅप्सचे मोफत अॅक्सेस मिळणार आहे. सरकारी टेलीकॉम कंपनीने भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांना आव्हान देण्यासाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत सरकारी टेलिकॉम कंपनीचा प्लॅन स्वस्त आहे आणि यामध्ये बरेच फायदे मिळणार आहेत. कंपनीने लाँच केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 200Mbps च्या सुपरफास्ट स्पीडने इंटरनेट एक्सेस मिळणार आहे. नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि यामध्ये मिळणारे फायदे जाणून घेऊया.
सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नव्या रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा एक सुपरस्टार ब्रॉडबँड प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत केवळ 999 रुपये आहे. कंपनीने लाँच केलेल्या या मंथली प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे, यूजर्सना घरामध्ये 200Mbps च्या स्पीडने इंटरनेट एक्सेस मिळणार आहे. याशिवाय, यूजर्सना या प्लॅनमध्ये 5TB म्हणजेच 5000GB इंटरनेट डेटाचा फायदा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीएसएनएलचा हा होम ब्रॉडबँड प्लॅन संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगसारखे फायदे ऑफर करणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडने सादर केलेल्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना जियोहॉटस्टार, हंगामा, झी 5, शेमारु.मी, एपीक ऑन सारख्या ओटीटी अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळणार आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना इंटरनेट अॅक्सेससह मोफत ओटीटीचे फायदे देखील मिळणार आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनीने आणखी काही स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील लाँच केले आहेत. भारत संचार निगम लिमिटेडने 799 रुपयांचा एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 150 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच हा प्लॅन फ्री नेशनल रोमिंग ऑफर करतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडने यूजर्ससाठी संपूर्ण भारतात 1 लाख नवीन 4G मोबाईल टॉवर लावले आहेत. यूजर्सना उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंपनी आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे. तसेच सरकारी कंपनी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.