पाकिस्तानच्या कराचीत सिलेंडरचा भीषण स्फोट; मोठ्या स्फोटानंतर तीन मजली इमारतच कोसळली (संग्रहित फोटो) 
World

पाकिस्तानच्या कराचीत सिलेंडरचा भीषण स्फोट; मोठ्या स्फोटानंतर तीन मजली इमारतच कोसळली, 16 जणांचा मृत्यू

सोल्जर बाजार परिसरात झालेल्या स्फोटात तीन मजली निवासी इमारतीचा काही भाग कोसळला. महिला आणि मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आणि 14 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट गॅस गळतीतून निघालेल्या ठिणगीमुळे झाला.

कृपादान आवळे

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील कराची येथे एक मोठी दुर्घटना घडली. सिलेंडरच्या स्फोटात एक निवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी पोलिस आणि स्थानिक बचाव पथकांचा हवाला देत ही माहिती दिली. कराचीच्या सोल्जर बाजारातील गुल राणा कॉलनी परिसरातील एका घरात ही दुर्घटना घडली.

सोल्जर बाजार परिसरात झालेल्या स्फोटात तीन मजली निवासी इमारतीचा काही भाग कोसळला. महिला आणि मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आणि 14 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट गॅस गळतीतून निघालेल्या ठिणगीमुळे झाला. सोल्जर बाजारातील गुल राणा कॉलनी परिसरातील एका निवासस्थानी ही घटना घडली. जखमी आणि मृतांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. मृतांमध्ये चार मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी असलेल्या बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रात्री पहिल्या मजल्यावर स्फोट झाला, ज्यामुळे इमारतीचा एक भाग कोसळला.

दरम्यान, पोलिस आणि बचाव पथके आता शोध मोहीम राबविण्यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा वापर करत आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा, कदाचित सिलेंडर किंवा गॅस सक्शन मशीनमधून गळती होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

जुलै 2025 मध्येही घडली होती दुर्घटना

पाकिस्तानच्या कराचीत मोठा स्फोट झाला. जुलै २०२५ मध्ये कराचीच्या लियारी भागात पाच मजली इमारत कोसळल्याने किमान २७ लोक मृत्युमुखी झाले आणि १० जण जखमी झाले होते. जीर्ण झालेल्या संरचनेमुळे अधिकाऱ्यांनी पाच मजली इमारत आधीच असुरक्षित घोषित केली होती. त्यानंतर ही इमारत कोसळून दुर्घटना घडली.

Saurav Das Oxford Event London: सौरव दास ऑक्सफर्डला जाण्यापासून का रोखले? केंद्र सरकारचे उच्च न्यायालयाला उत्तर

सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान वरदान ठरतात 'हे' पदार्थ, रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासोबतच हृदयाला होतील फायदे

NSE Global Ranking : सांगता काय? भारतीय शेअर बाजाराचा जागतिक डंका! NSE बनले जगातील तिसरे सर्वात मोठे एक्सचेंज

Viral news: फक्त नाव विचारलं अन् तिच्यासाठी गाणंच बनवलं! लखनऊच्या कॅब ड्रायव्हरने जिंकलं रशियन तरुणीचं मन