“ जेव्हा तुम्ही सायकल चालवता, तेव्हा हवा प्रदूषणही होत नाही आणि आवाजाचे प्रदूषणही होत नाही. तुम्ही जेव्हा हळुवारपने सायकलवरून जाता तेव्हा तुम्ही पक्ष्यांना ऐकू शकता,डोंगर-दर्यांना अनुभवू शकता आणि खरोखरंच तुमच्या सभोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊ शकता.’’
हा आहे उत्तर प्रदेश मधील ‘सुंदरम तिवारी’ यांचा मागच्या चार वर्षांपासून स्वतःवरील दृढ विश्वास आणि जगाला संदेश.
७ एप्रिल २०२२ रोजी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील २७ वर्ष वय असलेले सामाजिक कार्यकर्ते सुंदरम तिवारी आपली सायकल घेऊन भारताच्या प्रवासाला निघाले. त्यांचे उद्दिष्ट्य हेच होते कि, आपल्या कृतीतून लोकांना निसर्गाबद्दल आत्मीयतेची भावना आणि जागरूकता याची जाणीव करून द्यायची. कोणत्याही पद्धतीचा मदतीचा हात, सुरु केलेल्या कार्याची खात्री, काही नसताना त्यांनी जे करून दाखवलय ते नक्कीच कोणत्या रेकॉर्ड पेक्षा कमी नाही.
रोज सायकल चालवणं निरोगी आयुष्यासाठी फायदेशीर – Navarashtra
पुढच्या १४ महिन्यात, त्यांनी जवळपास १८,००० किमी एवढा प्रवास आपल्या सायकलवरून पूर्ण केला; अगदी डोंगर-दर्यांतून, जंगलांतून, वाळवंटांतून, शहरांतून आणि गाव-खेड्यांतूनही. या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्या बरोबर चोरीचेही प्रसंग घडले. कित्येक दिवस त्यांनी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून काढले, कित्येक लोकांना ते भेटले ज्यांनी त्यांना प्रोत्साहनही दिले त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी.
हा त्यांचा प्रवास थांबला जून २०२३ मध्ये. पण त्यांचे मिशन नाही. आज त्यांच्या ३१ व्या वयात, ते एक सामाजिक उपक्रम राबवत आहेत, ज्यात ते उत्तरप्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन प्रवासासाठी सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्या या ‘सायकल टू ऑफिस’ या उपक्रमाने जवळपास २५० वनविभागातील कर्मचाऱ्यांनी दैनंदिन वापरासाठी सायकलचा वापर करण्यास सुरुवात केलीय.
या आजारांमध्ये सायकलिंग खूप फायदेशीर ठरते – Navarashtra
या चार वर्षांच्या सायकलच्या प्रवासांत त्यांनी निसर्गाची होणारी हानीही पहिली बरोबरच ते अशाही लोकांना भेटले ज्यांनी त्यांची मदतही केली. त्यांच्या म्हणण्यानुसार हे फक्त निसर्गासाठीच नाहीये,तर भारतीयांच्या मानसिकतेसाठीही आहे. त्यांचे म्हणणे असे आहे कि, इतर देशात सायकल चालवणे हे चांगले आणि आदराचे समजले जाते. पण भारतात सायकल चालवणाऱ्या माणसाकडे तुच्ह नजरेने पाहण्याची पद्धत आहे. ही चुकीची मानसिकताही त्यांना मोडायची होती.
आता त्यांच्या या ‘सायकल टू ऑफिस’ या उपक्रमासाठी बऱ्याच भागांतून चांगलं प्रतिसाद येत आहे. निसर्गाच्या आणि मानवतेच्या त्यांच्या या सिंहाच्या वाट्याच्या कार्याला आपल्याला सलाम करायला हवा.






