भारतामध्ये पहिल्यापासूनच अँबेसेडर कारचे वर्चस्व होते. अगदी राजकारण्यांपासून ते जुन्या चित्रपटांमध्येही ही कार दाखवली जायची. पण तुम्हाला माहितीय का, या अँबेसेडर कारचे वर्चस्व निर्माण होण्यापूर्वी, तिचा पाया भक्कम करण्यासाठी एन महत्त्वाची कार होती, ती म्हणजे- हिंदुस्तान लँडमास्टर. पुढे जाऊन भारतीय ऑटोमोबाईलच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात प्रसिद्ध आणि ओळखली जाणारी कार म्हणून अँबेसेडरची सुरुवातही याच मॉडेलपासून झाली.
१९५५ मध्ये हिंदुस्तान मोटर्सने कोलकाता येथे लँडमास्टरचे उत्पादन सुरू केले. ही कार ब्रिटनच्या मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज II या मॉडेलवर आधारित होती. त्या काळात भारत स्वतःची औद्योगिक ओळख निर्माण करत होता आणि खासगी कार हा अजूनही दुर्मिळ प्रकार होता. अशा वेळी लँडमास्टरने भारतीय ग्राहकांना आरामदायी, मजबूत आणि विश्वासार्ह वाहनाचा पर्याय दिला.
भारताची शान होती ही कार! ‘ॲम्बेसेडर’ कारची यशोगाथा – Navarashtra
भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली होती. लांब पल्ल्याचे प्रवास, खडबडीत रस्ते, भरपूर सामान आणि मोठ्या कुटुंबासह प्रवास – या सर्व गोष्टी लँडमास्टर सहज हाताळत असे. त्यामुळे सरकारी विभाग, व्यावसायिक कुटुंबे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये ती लवकरच लोकप्रिय झाली.
लँडमास्टरने अनेक सहनशक्तीच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. विशेषतः कोलकाता ते दिल्ली हा दीर्घ प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण करून तिनं आपली विश्वासार्हता सिद्ध केली. त्यामुळे ही कार केवळ कागदावरच नव्हे, तर प्रत्यक्ष वापरातही सक्षम असल्याचं सिद्ध झालं.
ती परत येतेय – अॅम्बेसेडर कार नव्या रुपात बाजारात येण्याची शक्यता …
यानंतर लँडमास्टरचे रूपांतर अँबेसेडरमध्ये झाले आणि पुढील अनेक दशकांपर्यंत अँबेसेडरने भारतीय वाहनविश्वावर राज्य केलं. मात्र त्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी लँडमास्टरच होती. आज उरलेल्या प्रत्येक हिंदुस्तान लँडमास्टरकडे केवळ एक जुनी विंटेज कार म्हणून पाहिलं जातं नाही, तर भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात म्हणूनचं पाहिलं जातं.






