गेल्या काही वर्षात भारतात SUV (Sport Utility Vehicle) गाड्यांची मोठी क्रेझ वाढली आहे. एकेकाळी डोंगराळ, ग्रामीण भागात आणि लांब प्रवासासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्याया SUV गाड्या, आता मात्र त्यांच्या दमदार, मोठ्या बांधणीमुळे शहरांतील कुटुंबांच्या पहिली पसंती होऊन बसल्या आहेत. पण या सगळ्याबरोबरच एक मोठा प्रश्न समोर येऊन ठाकलाय, तो म्हणजे- या SUV गाड्या शहरांसाठी अनावश्यकपणे अवाढव्य आणि असुरक्षित होतायत का? चाल आज इथे जाणून घेऊयात,
पाहायला गेलं तर भारतातील बरीच शहरे अरुंद रस्ते, छोट्या छोट्या निमुळत्या गल्ल्या, पार्किंग साठी मर्यादित जागा आणि वाढत्या वाहतूक कोंडी यांसारख्या त्रासांनी ग्रासली आहेत. एखादी SUV जेवढ्या भागात पार्क होते, तेवढ्या जागेत एक हॅचबॅक कार आणि दोन-तीन टू-व्हीलरही पार्क होऊ शकतात. हेही तेवढंच सत्य आहे कि कोणी कोणती गाडी घ्यायला पाहिजे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण आपल्या निवडीमुळे आपल्या बरोबर इतरांचीही मोठी गैरसोय होत असेल, तर त्या निवडीचा सखोल विचार करायला हवा. पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत तर ही वाहतुकीची कोंडीची समस्या आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
भारतीय मार्केटमध्ये लवकरच ‘या’ एकापेक्षा एक Compact SUVs घालणार …
सुरक्षेच्या दृष्टीने पाहायला गेलं तर, SUV मध्ये बसणाऱ्या प्रवाशांना गाडीच्या उंच, दमदार बांधणीमुळे सुरक्षित वाटते. पण गाडीच्या उंचीमुळे आणि उंच बोनेटमुळे बऱ्याचदा रस्त्यावरचे पादचारी, सायकल किंवा छोट्या दुचाकीवर असणारेव लोक दिसत नाहीत आणि पर्यायी अपघातांना सामोरे जावे लागते. शिवाय गाडीचे वजन आणि आकारही प्रचंड असल्याने अपघातात थोडाही धक्का किंवा टक्कर या गाडीने मारल्यास पुढच्याचे मोठे नुकसान होऊ शकते.
याशिवाय, मोठ्या SUV गाड्यांचे वजन जास्त असल्याने इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जनही तुलनेने वाढते. जरी अनेक कंपन्या आता कॉम्पॅक्ट SUV बाजारात आणत असल्या तरी, ग्राहकांमध्ये अधिक मोठ्या आणि दमदार दिसणाऱ्या वाहनांची मागणी तशीच कायम आहे.
Compact SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांना ‘या’ कारची भुरळ, Tata आणि Kia …
तज्ज्ञांच्या मते, शहरांमध्ये वाहनांची निवड करताना केवळ आकर्षक लूक नव्हे तर रस्त्यांची परिस्थिती, पार्किंगची उपलब्धता आणि सर्वांसाठी सुरक्षितता यांचाही विचार होणे आवश्यक आहे. मोकळ्या रस्त्यांवर, महामार्गांवर, कमी ट्राफिकच्या शहरांमध्ये SUV चांगल्या काम करू शकतात. त्यामुळे SUV गाड्या पूर्णपणे चुकीच्या नाहीत, परंतु त्यांचा वाढता आकार मोठ्या शहरांच्या गरजांशी नेहमीच सुसंगत असेलच असे नाही.






