टोयोटाने आपल्या मोस्ट अवेटेड नवीन पिढीच्या ‘हायलक्स’ पिकअप ट्रकची आणखी एक नवीन टीझर झलक शेअर केली आहे. २८ जुलै २०२६ रोजी भारतात होणाऱ्या ऑफिशल एंट्रीपूर्वी गाडीप्रेमींची उत्सुकता वाढवण्यासाठी हा टीझर जारी करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच या नवव्या पिढीच्या हायलक्सने जागतिक बाजारात पदार्पण केले असल्याने, भारतीय मॉडेलमध्ये नेमके काय बदल पाहायला मिळतील याची स्पष्ट कल्पना समोर आली आहे.
रॉयल एनफिल्डचा जलवा! पहिल्या तिमाहीत पुन्हा ओलांडला ३ लाख विक्रीचा टप्पा; 350cc बाईक्सचा दबदबा कायम
इंटरेस्टिंग एक्सटीरियर डिझाइन
नवीन टीझरमध्ये गाडीच्या पुढच्या आणि मागच्या डिझाइनची अतिशय स्पष्ट झलक पाहायला मिळतेय. या नवीन मॉडेलमध्ये षटकोनी रचनेची नवी ब्लॅक ग्रिल, जास्त स्लिम LED हेडलाइट्स आणि नवीन डिझाइनची स्किड प्लेट असलेला फ्रंट बंपर देण्यात आलाय. गाडीचा साईड प्रोफाईल आधीसारखाच दणकट ठेवण्यात आला असला तरी यात नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स जोडण्यात आले आहेत. मागच्या बाजूला री-डिझाइन केलेले LED टेल लॅम्प्स आणि टेलगेटवर ठळक अक्षरांत दिलेले ‘Toyota’ चे नाव या पिकअप ट्रकला अधिक आधुनिक आणि आकर्षक रोड प्रेझेन्स देतात.
प्रीमियम केबिन रचना आणि अत्याधुनिक फीचर्स
सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बदल गाडीच्या केबिनमध्ये करण्यात आले आहेत. टोयोटाने जुन्या ७.८ इंच स्क्रीनऐवजी आता १२.३ इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ड्रायव्हरसाठी १२.३ इंचाचे पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. त्यासोबतच वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, व्हेंटिलेटेड व पॉवर फ्रंट सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि प्रीमियम अपहोल्स्ट्री यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ची जोड देण्यात आली आहे.
मर्सिडीज-AMG E 53 हायब्रिड सेडान भारतात लाँच! दमदार फीचर्स अन् जबरदस्त लुकसह जाणून घ्या किंमत
पावरफुल इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान
या नव्या मॉडेलमध्ये टोयोटाचा विश्वासू २.८-लीटर टर्बो डिझेल इंजिन कायम ठेवण्यात आला आहे, जो २०४ एचपी पॉवर आणि ५०० NM टॉर्क जनरेट करतो. हा इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह प्रॉपर ४x४ क्षमतेमध्ये उपलब्ध असेल.






